TRENDING:

तांब्याच्या भांड्यात पाणी प्यायल्याने होतात खूपच फायदे, महत्त्वाची माहिती, VIDEO

Last Updated:

दररोज सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणे हा एक उपाय आहे. यामुळे अनेक आजारांना आळा घालण्यास मदत होते, असे डॉक्टरांकडून सांगण्यात येते. त्याचबाबत डॉ. पूनम बहुरूपी यांनी अधिक माहिती दिली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
प्रगती बहुरुपी, प्रतिनिधी
advertisement

अमरावती - सद्यस्थितीमध्ये रासायनिक पदार्थाचा वापर जास्त प्रमाणात होत आहे. त्यामुळे अनेक आजार उद्भवतात. आपले आजी आजोबा आपल्याला सांगतात, आमच्या वेळी असं नव्हतं, या पदार्थाची चव रुचकर लागत होती. आता तर कशातच काही चव राहलेली नाही. मात्र, यामागचे कारण म्हणजे वातावरणातील बदल आणि रसायनाचा अती वापर आहे.

अशा परिस्थितीत लठ्ठपणा, थायरॉईड, कमी वयात केस पांढरे होणे या सर्व समस्या आपल्याला आढळून येत आहे. याला आळा घालण्यासाठी दररोज सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणे हा एक उपाय आहे. यामुळे अनेक आजारांना आळा घालण्यास मदत होते, असे डॉक्टरांकडून सांगण्यात येते. त्याचबाबत डॉ. पूनम बहुरूपी यांनी अधिक माहिती दिली.

advertisement

तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्याने होणारे फायदे -

1. लठ्पणा कमी होतो - तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्याने पचनक्रिया सुधारते. शरीरातील खराब चरबी लवकर कमी होते आणि लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते.

नाशकात पितृपक्षात होते भाविकांची मोठी गर्दी, काय आहे येथील महात्म्य, VIDEO

2. थायरॉईडसाठी उपयुक्त - तांब्यामधील पाणी पिल्याने थायरॉक्सिन हार्मोन्स संतुलित ठेवण्यास मदत होते. त्यामुळे डॉक्टर थायरॉईड असणाऱ्या व्यक्तीला तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचा सल्ला देतात.

advertisement

pitru paksha 2024 : पितृपक्षातील ‘या’ 4 तिथी फार महत्वाच्या, या दिवसात नेमकं काय करावं, VIDEO

3. पचन संस्था सुधारते - तांब्यामध्ये पोट लिव्हर अवयवांना डिटॉक्स करण्याचे अनेक गुणधर्म आहे. याने पोटात अल्सर किंवा इन्फेक्शनचा त्रास कमी होण्यास मदत होते. त्यामुळे पचनसंस्था सुधारते.

4. केस पांढरे होण्यास मदत होते - केस पांढरे होण्याची समस्या ही आहारातील लोह, जस्त, तांबे यांच्या कमतरतेमुळे उद्भवते. तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याने ही समस्या दूर होते, असेही त्यांनी सांगितले.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
45 वर्षांपासून जपलीये तिच चव, सोलापुरातील फेमस शिक कढई, एकदा खाल तर पुन्हा याल
सर्व पहा

सूचना - ही माहिती आरोग्यतज्ञांशी साधलेल्या संवादावर आधारित आहे. ही माहिती सार्वजनिक आहे. कोणताही वैयक्तिक सल्ला नाही. त्यामुळे लोकल18 याबाबत कोणताही दावा करत नाही.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/अमरावती/
तांब्याच्या भांड्यात पाणी प्यायल्याने होतात खूपच फायदे, महत्त्वाची माहिती, VIDEO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल