नाशकात पितृपक्षात होते भाविकांची मोठी गर्दी, काय आहे येथील महात्म्य, VIDEO
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
Last Updated:
पितृपक्षाच्या खरा प्रारंभ हा पौर्णिमेपासून म्हणजेच 18 सप्टेंबर रोजी प्रतिपदा तिथीने सुरू झाला आहे. यावेळी पूर्वजांच्या तर्पणासाठी आत्म्यांना शांतीसाठी श्रद्धेने पूजा केली जाते. सर्वपित्री अमावसेपर्यंत विविध तिथींना श्राद्ध आणि धार्मिक विधी पार पडत असतात.
कुणाल दंडगव्हाळ, प्रतिनिधी
नाशिक - भाद्रपद पौर्णिमेनंतर सुरू होणारा पितृपक्ष हा हिंदू धर्मात अत्यंत महत्त्वाचा काळ मानला जातो. पूर्वजांना श्रद्धांजली वाहण्यासाठी श्राद्ध विधी या काळात पार पडत असतात. यंदा पितृपक्षाचा पंधरवडा हा सप्टेंबर महिन्याच्या 18 तारखेपासून ऑक्टोबर महिन्याचे 2 तारखेपर्यंत चालणार आहे. नाशिक ब्राम्हण समितीचे अध्यक्ष प्रसाद शुक्ल गुरुजी यांनी याबाबत माहिती दिली.
advertisement
या काळात पिंडदान, ब्राम्हण पूजन आणि अन्न दानधर्माचे असे महत्त्वाचे विधी केले जातात. पितृपक्षाच्या खरा प्रारंभ हा पौर्णिमेपासून म्हणजेच 18 सप्टेंबर रोजी प्रतिपदा तिथीने सुरू झाला आहे. यावेळी पूर्वजांच्या तर्पणासाठी आत्म्यांना शांतीसाठी श्रद्धेने पूजा केली जाते. सर्वपित्री अमावसेपर्यंत विविध तिथींना श्राद्ध आणि धार्मिक विधी पार पडत असतात.
pitru paksha 2024 : पितृपक्षातील ‘या’ 4 तिथी फार महत्वाच्या, या दिवसात नेमकं काय करावं, VIDEO
देशभरातील विविध भाविक या काळात विधी कार्यक्रमासाठी नाशिक येथील पंचवटीमध्ये गोदा घाटावर येत असतात. नाशिक येथील गोदावरी घाटाला अनेक महत्त्व प्राप्त झाले आहे. त्याचप्रमाणे प्रभू श्रीरामाने वनवासात असताना आपल्या पित्याचे म्हणजेच दशरथ राजाचे पिंडदान आणि श्राद्ध याच ठिकाणी केले आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी साक्षात महादेव सुद्धा विराजमान आहे.
advertisement
इतकेच नाही तर या ठिकाणी गोदावरी नदी ही दक्षिण दिशेला वाहत असल्याने हिला दक्षिणगंगेचे स्थान प्राप्त झाले आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी कुंभमेळा देखील भरत असतो. त्यामुळे या ठिकाणी भारतातील नागरिक आपल्या पितरांचे पिंडदान करण्यासाठी मोठ्या संख्येने विविध भागातून येत असतात, अशी माहिती नाशिक ब्राम्हण समितीचे अध्यक्ष प्रसाद शुक्ल गुरुजी यांनी दिली.
advertisement
Disclaimer : या बातमी दिलेली माहिती ही राशी-धर्म आणि शास्त्रांच्या आधारावर ज्योतिषाचार्य आणि आचार्यांसोबत संवाद करुन लिहण्यात आली आहे. ही माहिती सार्वजनिक आहे. कोणताही वैयक्तिक सल्ला नाही. याबाबत लोकल18 कोणताही दावा करत नाही.
view commentsLocation :
Nashik,Maharashtra
First Published :
September 18, 2024 7:01 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
नाशकात पितृपक्षात होते भाविकांची मोठी गर्दी, काय आहे येथील महात्म्य, VIDEO

