छत्रपती संभाजीनगर : शारदीय नवरात्र उत्सवाला 3 ऑक्टोबर पासून सुरुवात होणार आहे. नवरात्रमध्ये सर्वत्र भक्तिमय आणि आनंद वातावरण असतं. आपण अगदी मनोभावे आदी मायेची पूजा आणि प्रार्थना करतो. पण तरुणांमध्ये गरबा आणि दांडियाचा उत्साह असतो. या नवरात्रासाठी तुम्हाला सुंदर ब्लाऊज, ओढणी, लेहंगा किंवा चनिया चोली खरेदी करायची असेल तर तुम्ही छत्रपती संभाजीनगर शहरातील गुलमंडी या ठिकाणी असलेल्या मोरया कलेक्शनमधून खरेदी करू शकता. ते सुद्धा अगदी स्वस्त दरामध्ये.
advertisement
नवरात्र उत्सव आता थोड्या दिवसांवर येऊन ठेपला आहे. गरबा आणि दांडियाची नवरात्रीमध्ये धूम असते. यासाठी सुंदर ट्रेंडी असे ब्लाऊज आपण खरेदी करत असतो. या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेंडी ब्लाऊज उपलब्ध आहेत. यामध्ये तुम्हाला मिरर वर्क, फॅन्सी डिझाईन, बॅकलेस ब्लाऊज उपलब्ध आहेत. इथं आजून देखील ब्लाऊजचा डिझाईन उपलब्ध आहेत. या ठिकाणी 300 रुपयांपासून तुम्ही ब्लाऊज खरेदी करू शकता. त्यासोबत या ठिकाणी ट्रेण्डी जॅकेट देखील भेटून जातील आणि स्पेशल नवरात्रीसाठी दुपट्टा देखील आहेत. हे देखील 350 रुपयांपासून मिळतात.
सुंदर परसबाग अन् डिजिटल क्लास रूम, जालन्यातील जिल्हा परिषद शाळेला मिळाला तीन लाखांचा पुरस्कार
तसेच नवरात्रीसाठी लेंहेंगा चोली, बांधणीची लेहेंगा देखिल उपलब्ध आहे. तसेच तुम्हाला सिंगल लेहेंगा देखील भेटून जाईल. 900 रुपयांपासून याची सुरुवात आहे. तुम्हाला सुद्धा या सर्व गोष्टी खरेदी करायच्या असतील तर खरेदी करू शकता. या ठिकाणी डिस्काउंट देखील भेटून जाईल, असं विक्रेता नम्रता सुरळे यांनी सांगितलेले आहे.





