TRENDING:

भगर खाण्याचे आहेत भरपूर फायदे, अनेकांना माहिती नसेल, तज्ज्ञांनी काय सांगितलं?

Last Updated:

भगर खाण्याचे नेमके काय फायदे आहेत, याबाबत आहारतज्ञ अलका कर्णिक यांनी महत्त्वाची माहिती दिली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अपूर्वा तळणीकर, प्रतिनिधी
advertisement

छत्रपती संभाजीनगर : उद्या आषाढी एकादशी आहे. एकादशीचा उपवास हा हिंदू धर्मात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या उपवासाला आपण सर्वजण साबुदाणा खिचडी किंवा भगर खातो. यामध्ये भगर खाण्याचे शरीराला भरपूर फायदे भेटतात. भगरमधून आपल्याला प्रोटीन, फायबर मिळतात. त्यासोबत अजून असे खूप फायदे आहेत. त्यामुळे भगर खाण्याचे नेमके काय फायदे आहेत, याबाबत आहारतज्ञ अलका कर्णिक यांनी महत्त्वाची माहिती दिली.

advertisement

लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, भगर खाण्याचे आपल्या शरीराला भरपूर असे फायदे मिळतात. तसेच ज्यांना मोठ्या प्रमाणात अ‍ॅसिडिटी होते, जास्त साबुदाणा खाल्ल्याने किंवा शेंगदाणे खाल्ल्याने अशा सर्वांनी वरईचा अर्थात भगरीचा साधा भात करून खावा. यामुळे तुम्हाला अ‍ॅसिडिटी समस्या होणार नाही. भगरमध्ये विटामिन ई विटामिन सी, आणि विटामिन ए असतात आणि यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढायला मदत होते. तुम्ही कधीही भगर खाली तर ती तुम्हाला फायदेशीर ठरते.

advertisement

पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी! आषाढी एकादशीचा उपवास का केला जातो, ही आहे यामागची कहाणी

भगर ही अतिशय हलकी असते. यामुळे तुम्हाला ती सहज पचन होते आणि कुठलाही त्रास होत नाही. ज्यांची बैठी जीवनशैली आहे तसेच ज्यांना लठ्ठपणा आहे, अशांसाठी भगर अतिशय चांगली आहे. भगरमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर आहेत आणि ते आपल्या शरीरासाठी अत्यंत चांगले आहेत. तसेच हाडांसाठीही भगर ही अतिशय चांगली आहे. त्यामुळे तुम्ही नेहमीच भगर खाल्ली तरी ती फायदेशीर ठरते, असेही त्या म्हणाल्या.

advertisement

वाळूज, पंढरपूरकडे जाणाऱ्या वाहतूक मार्गात बदल, आषाढी एकादशीच्या निमित्ताने प्रशासनाचा मोठा निर्णय

पुढे त्या म्हणाल्या की, ज्यांना मधुमेह आहे, ज्यांची बैठे जीवनशैली आहे, ज्यांना हृदयविकार आहे किंवा लहान मुलं आहेत, अशा सर्वांनी जर भगर खाल्ली तर ती त्यांना फायदेशीरच ठरते. यामुळे तुम्हाला कुठलाही त्रास होत नाही आणि पचण्यास त्रास होत नाही. त्यामुळे भगर खाल्ल्याचे असे भरपूर फायदे होतात. उपवासाच्या दिवशी भगर खाणे हे चांगले आहे. मात्र, ती अतिरिक्त प्रमाणामध्ये खाऊ नये, अन्यथा तुम्हाला त्रास होईल.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सांधेदुखी होईल कमी, जेवणात समावेश करा कडीपत्ता आणि तिळाची चटणी, रेसिपीचा Video
सर्व पहा

सूचना - ही बातमी आरोग्यतज्ञांशी साधलेल्या संवादावर आधारित आहे. ही माहिती सार्वजनिक आहे. वैयक्तिक सल्ला नाही. त्यामुळे लोकल18 याबाबत कुठलाही दावा करत नाही. 

मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
भगर खाण्याचे आहेत भरपूर फायदे, अनेकांना माहिती नसेल, तज्ज्ञांनी काय सांगितलं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल