छत्रपती संभाजीनगर : श्रावण महिना सुरू झाला की सर्व सणावारांना सुरुवात होते. त्यामुळे आता एका पाठोपात एक सर्व सणांना सुरुवात झाली आहे. सण म्हटल्यावर सर्वच गोष्टींचे भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येते. यामुळे आता सध्या गव्हाचे आणि बाजरीचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. ही भाव वाढ नेमकी कशामुळे झाली, याची काय कारणे आहेत, याबाबत लोकल18 च्या टीमने घेतलेला हा आढावा.
advertisement
छत्रपती संभाजीनगरमधील व्यापारी निलेश सोमाणी यांच्याशी लोकल18 च्या टीमने संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, पाऊस पडल्यानंतर बाजरीला मोठ्या प्रमाणामध्ये मागणी येते. सोबतच यावर्षी गव्हाचे उत्पन्न हे 20 ते 25 टक्क्यांनी कमी झाल्याने गव्हाचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. गहू बाजारपेठेत कमी उपलब्ध आहे. सण असल्यामुळे गव्हाला मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आहे. चांगल्या गव्हाचे भाव हे मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. क्विंटल मागे 200 ते 250 रुपयांनी गव्हाची भाववाढ झाली आहे. तर बाजरीमध्ये 100 ते 150 रुपयांनी ही भाववाढ झाली आहे. तसेच सध्या हे भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे, असेही त्यांनी सांगितले.
पावसाळा आणि Viral Infection, अशी घ्या आपल्या आरोग्याची काळजी, महत्त्वाच्या टिप्स
मध्यम कॉलिटीच्या गव्हाच्या किमती या कमीत कमी 3000 ते जास्तीत जास्त 3600 रुपयांपर्यंत आहे. तर शरबती गहू हा 3600 ते 4000 रुपयांपर्यंत प्रति क्विंटल दराने विकला जात आहे. पूर्वी गव्हाचे भाव हे 2600 येते 3000 पर्यंत होते. त्यासोबतच बाजरीचे भाव हे 2800 येते 3400 पर्यंत होते. तर शरबती गहू हे 3400 ते 3800 रुपयांपर्यंत होते. पूर्वीचे बाजरीचे भाव हे 2600 ते 2800 रुपयांपर्यंत होते.
ऑलिम्पिकमध्ये मेडल जिंकणाऱ्या खेळाडूंना सरकार किती पैसे देते? काय सुविधा मिळतात?
सध्या उन्हाळी बाजरी बाजारामध्ये येत आहे. तसेच यावर्षी महाराष्ट्रामध्ये मध्यप्रदेश, राजस्थान आणि उत्तर प्रदेशातून गव्हाची आवक होत आहे. बाजरीची आवकही राजस्थान आणि महाराष्ट्रात होत आहे. अजूनही गव्हाचे भाव वाढवण्याची शक्यता आहे. पण बाजरीचे भाव हे थोड्या दिवसांमध्ये कमी होण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे. पण ऐन सणासुदीच्या काळात ही भाववाढ झाल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लागणार आहे.