धाराशिव : शेतीला तंत्रज्ञानाची जोड देत शेतकरी पिकांवर ड्रोन द्वारे फवारणी करत आहेत. यावर्षी खरिपातील पिकांची जोरदार वाढ झाली आहे. धाराशिव जिल्ह्यात या खरीप हंगामात सर्वाधिक सोयाबीन पिकाचा पेरा झाला आहे. पिकांच्या जोमदार वाढीमुळे शेतकरी ड्रोनद्वारे सोयाबीनची, मका, तूर, आधी खरिपाच्या पिकांची फवारणी करीत आहे.
सततच्या ढगाळ वातावरणामुळे सोयाबीनवर विविध कीड रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे पावसाची उघडीप होताच शेतकऱ्यांनी पिकांवर फवारणी करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, बहुतांश शेतकरी सध्या बॅटरी संचलित फवारणी पंपाने, किंवा पेट्रोल संचलित, फवारणी पंपाने फवारणी करतात. त्यामुळे शेतकऱ्यांना पाठीवर स्प्रे पंप घेऊन सोयाबीनमध्ये किंवा खरीपातील पिकातून चालावे लागते.
advertisement
त्या तुलनेत ड्रोनद्वारे फवारणी करणे शेतकऱ्यांसाठी फायद्याचे ठरते आहे. केवळ 7 ते 10 मिनिटात एक एकर सोयाबीनची फवारणी होत आहे. ड्रोनद्वारे एक एकर फवारणी करण्यासाठी 700 रुपयांचा खर्च येतो. तर एक व्यक्तीला जर एक एकर सोयाबीनची फवारणी करायला सांगितले तर जवळपास पाचशे रुपयांचा खर्च येतो.
त्यामुळे ड्रोन द्वारे फवारणी केल्याने औषधांची बचत होते आहे. तसेच वेळेची बचत होत आहे. त्यामुळे ड्रोनद्वारे फवारणी करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. धाराशिव जिल्ह्यातल्या भूमच्या परिसरात ड्रोनद्वारे फवारणी करण्यात येत आहे. ड्रोनच्या खरेदीसाठी सरकारकडून अनुदान देखील देण्यात येत आहे.
विनेश फोगाट ऑलिम्पिकमध्ये अपात्र, कुस्तीपंढरी कोल्हापुरातील कुस्तीपटूंनी घातली ही भावनिक साद, VIDEO
यामुळे खऱ्या अर्थाने शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाली आहे. कमीत कमी खर्चात, कमीत कमी वेळेत शेतकरी ड्रोन द्वारे फवारणी करीत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.