जालना: प्रत्येक शहराची विशिष्ट अशी ओळख असते. त्याचप्रमाणे शहरातील विशिष्ट परिसर देखील काही गोष्टींसाठी प्रसिद्ध असतो. जालना शहरातील सिंधी बाजारात भरणारा लोखंडी वस्तूंचा बाजार देखील असाच प्रसिद्ध आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या गृह उपयोगी तसेच शेती कामासाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या लोखंडी वस्तू या ठिकाणी उपलब्ध असतात. त्यामुळे जालना शहरातील गृहिणींबरोबरच शेतकऱ्यांची या ठिकाणाहून वस्तू खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी पाहायला मिळते. अतिशय माफक दरामध्ये दर्जेदार वस्तू मिळत असल्याने ग्राहकांची या बाजाराला पसंती असते.
advertisement
जालना शहरातील लोहार समाज हा पारंपारिक पद्धतीने लोखंडी वस्तू बनवण्याचे काम करत असतो. तर या समाजातील महिला या तयार वस्तू जालना शहरातील सिंधी बाजारातील लोखंडी बाजारात विकण्याचे काम करतात. सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 8 वाजेपर्यंत हा बाजार सुरू असतो. वर्षातील बाराही महिने या बाजारात वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू मिळतात. उन्हाळ्यात आंब्याचे लोणचे करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कैरी कापण्याच्या अडकित्तापासून ते कुरड्या साठी लागणाऱ्या सूऱ्यापर्यंत सर्व वस्तू या ठिकाणी मिळतात. तसेच जनावरांसाठी लागणाऱ्या छोट्या भोरकडेपासून ते खडक फोडणाऱ्या पहारीपर्यंत अशा लहान मोठ्या सगळ्या प्रकारच्या वस्तू या बाजारात उपलब्ध आहेत.
आस्मानी संकटानं बळीराजा हैराण, मोसंबीच्या बागेवर चालवला जेसीबी, Video
शेतीसाठी लागणाऱ्या या वस्तू उपलब्ध
शेतीसाठी लागणारी कुऱ्हाड 150, टिकाव 300, फावडे 180, विळा 50, कोयता 100, खुरपे 50, दत्ताळे 250, कुदळ 250, जनावरांसाठीची भोरकडे 20, पास 300 त्याचबरोबर छन्नी 100, हातोडा 200, पहार 300, मेखजोडी 150 इत्यादी वस्तू उपलब्ध आहेत.
या गृहोपयोगी वस्तू उपलब्ध
माठ ठेवण्यासाठी आवश्यक असणारी घडोंची 100, भाजी चिरण्यासाठी लागणारी विळी 100, कुरडयासाठी लागणारा सोऱ्या 150, धान्य निवडण्यासाठी लागणारी चाळणी 80, चाकू, सुरा, कैऱ्या कट करण्याचा अडकित्ता 350 आदी गृहोपयोगी वस्तू इथे माफक दरात मिळतात.
तब्बल 3 फूट लांबीची कणसे, शेतकऱ्याने बाजरीच्या शेतीतून केली कमाल, पाहा PHOTOS
पारंपारिक व्यवसाय असल्याने हाच व्यवसाय आम्हाला करावा लागतो. त्याशिवाय दुसरे काम आम्हाला जमत नाही. सिझन असल्यावर दोन ते अडीच हजारांचा व्यवसाय होतो. तर सिझन नसताना 500 ते हजार रुपयांचा व्यवसाय होतो. यातूनच कुटुंबाचा उदरनिर्वाह होत असल्याचं अंजना सोळंके यांनी सांगितलं. विशेष, म्हणजे कोणत्याही ग्राहकाला कमी जास्त करून वस्तू विकण्यालाच या महिलांचं प्राधान्य असतं.





