TRENDING:

Pune Ganeshotsav: घरच्या बाप्पासमोर शिवरायांच्या शौर्याची झलक, लाल महालाचा देखावा ठरतोय शिवप्रेमींसाठी आकर्षण

Last Updated:

Pune Ganeshotsav: संकेत बलकवडे यांनी यावर्षी आपल्या घरच्या गणपतीसमोर एक अद्भुत आणि ऐतिहासिक देखावा साकारला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे: गणेशोत्सवाला भक्ती आणि श्रद्धा यांचा संगम मानलं जातं. या सणात प्रत्येकजण आपली कला आणि कल्पकता दाखवतो. नारायण पेठेत राहणाऱ्या संकेत बलकवडे यांनी यावर्षी आपल्या घरच्या गणपतीसमोर एक अद्भुत आणि ऐतिहासिक देखावा साकारला आहे. 'लाल महाला'च्या या देखावातून शिवरायांच्या शौर्याचा अनुभव मिळतो.
advertisement

लाल महाल म्हटलं की, इतिहासप्रेमींच्या डोळ्यांसमोर शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा प्रसंग उभा राहतो. याच लाल महालात शिवाजी महाराजांनी शत्रू शायिस्तेखानाची बोटं तोडली होती. तो ऐतिहासिक क्षण आणि त्यामागील शौर्यगाथा आजही लोकांच्या हृदयात जिवंत आहे. हाच ऐतिहासिक वारसा बलकवडे यांनी आपल्या कलाकृतीतून जपला आहे. या संकल्पनेला साकार करताना त्यांनी प्रचंड मेहनत घेतली.

advertisement

Modak Demand: उकडीचे नाही तर यंदा वेगळेच मोदक हिट, आठवड्यात 10 टनांपेक्षा अधिक मोदकांची विक्री

या देखाव्याबद्दल बोलताना संकेत बलकवडे म्हणाले, "लाल महाल आपल्या घरात असावा, ही संकल्पना माझ्या मनात होती. सध्या जो लाल महाल पाहायला मिळतो, तो दोन बाजूंनी दिसतो. मात्र, माझा प्रयत्न होता की, माझ्या देखाव्यातील लाल महाल चारही बाजूंनी पूर्ण दिसावा." लाल महालाच्या देखाव्यात एमडीएफ शीट्सचा वापर करण्यात आला आहे. लेझर कटिंग तंत्रज्ञानाच्या मदतीने खिडक्या, दरवाजे, सजावटीचे भाग यांची नक्षीदार रचना तयार करण्यात आली. प्रत्येक तपशील जपून आणि अतिशय अचुकपणे हा महाल साकारला आहे.

advertisement

बलकवडे म्हणाले, "पुण्याचे ऐतिहासिक वाडे आणि किल्ले यांचा वारसा डोळ्यासमोर ठेवून हा देखावा तयार केला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मी वेगवेगळ्या वाड्यांचे देखावे करत आलो आहे. यावर्षी लाल महालाची निवड केली." संपूर्ण देखावा तयार करण्यासाठी जवळपास एक महिन्याचा कालावधी लागला. ऐतिहासिक रचना, रंगसंगती, आणि वातावरणाचा अनुभव देण्यासाठी प्रत्येक तपशील अतिशय बारकाईने हाताळला आहे.

advertisement

या कलाकृतीत शिवरायांच्या पराक्रमाची झलक दिसते. गणेशोत्सवाच्या काळात अशा कलाकृती केवळ डोळ्यांना आनंद देत नाहीत, तर नव्या पिढीला इतिहासाची ओळख करून देतात. शिवाजी महाराजांचा पराक्रम, लाल महालाची ऐतिहासिक महती आणि त्यामागचा वारसा लोकांच्या मनात नव्या जोमाने रुजवण्याचा प्रयत्न बलकवडे यांनी केला आहे. नारायण पेठेत साकारलेला हा देखावा गणेशोत्सवातील एक मोठं आकर्षण ठरला आहे. संकेत बलकवडे यांची मेहनत, ऐतिहासिक जाण, आणि कलात्मकतेचा संगम यामुळे या देखाव्याला विशेष महत्त्व मिळाले आहे. हा देखावा बघण्यासाठी अनेक शिवप्रेमी बलकवडे यांच्या घरी येत आहेत.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Pune Ganeshotsav: घरच्या बाप्पासमोर शिवरायांच्या शौर्याची झलक, लाल महालाचा देखावा ठरतोय शिवप्रेमींसाठी आकर्षण
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल