Pune : फोन उचला अन् समस्या सांगा, अजितदादांची पुण्यातील या भागासाठी खास हेल्पलाईन

Last Updated:

Pune : फोन उचला आणि थेट तुमची समस्या मांडा. पुण्यातील नागरिकांसाठी अजितदादांनी खास हेल्पलाईन सुरू केली आहे. या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअॅप करून तुम्ही तुमच्या समस्या नोंदवू शकता, त्या थेट अजितदादांपर्यंत पोहोचतील.

News18
News18
पुणे : पुणेकरांनो तुमच्या दैनंदिन समस्या, गरजा आणि अडचणी थेट आपल्या नेतृत्वापर्यंत पोहोचवण्याची संधी आता तुमच्या हातात आहे. तुम्ही जेव्हा कुठल्या समस्या भोगत असता. मग ती रस्ते, पाणी, स्वच्छता, वाहतूक, आरोग्य, शिक्षण किंवा इतर कोणत्याही प्रकारची असो आता त्या समस्यांचा उपाय थेट तुम्हाला मिळू शकतो. यासाठी फक्त 7888566904 या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअॅप करून तुमची समस्या नोंदवावी लागेल. तुमची माहिती थेट अजितदादा यांच्यापर्यंत पोहोचेल आणि त्यावर तत्काळ लक्ष दिले जाईल.
येत्या 13 सप्टेंबरपासून हडपसरसह संपूर्ण राज्यभर सुरू होणाऱ्या 'जनसंवाद'या विशेष कार्यक्रमात सहभागी होण्याची ही सुवर्णसंधी आहे. हडपसरसह विविध भागात आयोजित होणाऱ्या जनसंवाद कार्यक्रमात तुम्हाला थेट सहभागी होण्याची संधी मिळेल. कार्यक्रमाची माहिती माध्यमांद्वारे वेळोवेळी तुम्हाला दिली जाईल,त्यामुळे तुम्ही तुमच्या भागात जनसंवाद कधी आयोजित केला जात आहे हे सहजपणे जाणून घेऊ शकाल.
advertisement
तुम्हाला फक्त 7888566904 या नंबरवर उपलब्ध असलेल्या व्हॉट्सअॅप चॅटबॉटवर तुमची माहिती आणि समस्या नोंदवायची आहे. नोंद झाल्यानंतर,तुम्हाला जनसंवाद कार्यक्रमासाठी निश्चित वेळ दिला जाईल. त्या दिवशी तुमच्या भागातील संबंधित अधिकारी उपस्थित राहतील. तुम्ही थेट संवाद साधून तुमच्या समस्या स्पष्ट करू शकता आणि संबंधित अधिकारी त्या समस्यांचे त्वरित निराकरण करण्यासाठी प्रयत्नशील राहतील.
advertisement
advertisement
मी स्वतः देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहीन. प्रत्येक नागरिकाच्या अडचणी आणि समस्या लक्षात घेऊन त्वरित उपाययोजना करण्यासाठी प्रयत्नशील राहीन. जनसंवाद हा कार्यक्रम फक्त संवादापुरता मर्यादित न राहता, जनविकास साधण्याचा आमचा ध्यास आहे. नागरिकांच्या न्याय-हक्कांसाठी मी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सदैव कटिबद्ध आहोत.
चला एकत्र येऊया आणि हडपसर येथे होणाऱ्या पहिल्या जनसंवाद कार्यक्रमाला भेट देऊया. तुमच्या समस्या समजून घेणे आणि त्यावर योग्य तो उपाय करण्यासाठी आम्ही तुमच्या सोबत आहोत. या संधीचा उपयोग करून, चांद्यापासून बांद्यापर्यंत सर्वांगीण विकास साधण्यासाठी आपण एकत्र प्रयत्न करूया. जनतेच्या हितासाठी, न्यायासाठी आणि विकासासाठी तुमचा सहभाग खूप महत्त्वाचा आहे.
मराठी बातम्या/पुणे/
Pune : फोन उचला अन् समस्या सांगा, अजितदादांची पुण्यातील या भागासाठी खास हेल्पलाईन
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement