असा असेल गणेश विसर्जन मिरवणूक मार्ग
लोकमान्य गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक मार्ग हा पत्रा तालीम येथून सुरुवात होणार आहे. पुढे सळई मारुती गवंडी गल्ली – मल्लिकार्जुन मंदिर बाळीवेस तरटी नाका चौकी- छत्रपती शिवाजी महाराज चौक-सरस्वती चौक आसार मैदान मार्गे गणपती घाट येथे विसर्जन करण्यात येणार आहे.
मध्यवर्ती गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक ही दत्त चौक येथून सुरू होणार असून राजवाडे चौक-गंगा विहीर-चौपाड बालाजी मंदिर पंजाब तालीम- मल्लिकार्जुन मंदिर- बाळीवेस चाटी गल्ली-मंगळवार पेठ पोलिस चौकी- मधला मारुती चौक कसबा पोलिस चौकी मार्गे गणपती घाट येथे विसर्जन करण्यात येईल.
advertisement
पूर्व विभागातील विसर्जन मिरवणूक ही कन्ना चौक येथून सुरू होणार असून, जुनी जोडभावी पेठ पोलिस चौकी नेताजीनगर, भुलाभाई चौक-मार्कंडेय चौक- जोडबसवण्णा चौक-भद्रावती पेठ- आंध्रदत्त चौक-कुचननगर जेलरोड पोलिस ठाणे- किडवाई चौक पंचकट्टा मार्गे विष्णू घाट येथे विसर्जन करण्यात येणार आहे.
लष्कर विभाग गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक ही नळ बाजार चौक येथून सुरू होऊन पुढे मुर्गी नाला- सतनाम चौक कुंभार गल्ली -मौलाली चौक- जगदंबा चौक सात रस्ता पत्रकार भवन मार्गे धर्मवीर संभाजी तलाव येथे विसर्जन करण्यात येईल.
विजापूर नाका मध्यवर्ती विसर्जन मिरवणूक सैफुल येथून सुरुवात होणार आहे. इंचगिरी मठ आयटीआय पोलिस चौकी ते धर्मवीर संभाजी महाराज कंबर तलाव येथे विसर्जन करण्यात येईल.
होटगी रोड मध्यवर्ती गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक ही हत्तुरे वस्ती येथून सुरू होणार असून मजरेवाडी आसरा चौक-डीमार्ट-भारती विद्यापीठ-आयटीआय पोलिस चौकी मार्गे धर्मवीर संभाजी तलाव विसर्जन करण्यात येणार आहे.
घरकुल मध्यवर्ती गणेश विसर्जन मिरवणुकीला पंचमुखी देवस्थान येथे सुरूवात होऊन मारुती मंदिर - संभाजीराव शिंदे हायस्कूल समोरून पोशम्मा सागर चौक नवनीत चौक- श्री नेत्र चौक मार्गे म्हाडा विहीर येथे विसर्जन करण्यात येणार आहे.
नीलमनगर मध्यवर्ती गणेशोत्सव मिरवणूक दुर्गादेवी मंदिर येथून सुरू होऊन सिद्धेश्वर चौक, करली बनशंकरी हॉटेल मार्गे परळकर विहीर येथे विसर्जन करण्यात येईल.
बाळे मध्यवर्ती गणेश विसर्जन मिरवणूक ही बाळे परिसरातून निघणार आहे. यामुळे हा मार्ग रहदारीस बंद असणार आहे. शहरात जड वाहनांना मिरवणूक संपेपर्यंत वाहतुकीस बंदी राहील.
Vande Bharat Train: सोलापूर – मुंबई वंदे भारतबाबत मोठा निर्णय, प्रवाशांना फायदा, तिकीट मिळणं सोप्पं!
पर्यायी मार्ग कोणते?
विजापूरकडून पुणे किंवा हैदराबादला जाणाऱ्या वाहनांनी नवीन विजापूर नाका- नवीन बायपास मार्गे केगाव ब्रिजपासून पुढे जावे.
हैदराबादकडून पुणे किंवा विजापूरकडे जाणाऱ्या वाहनांनी नवीन हैदराबाद नाका- जुना हैदराबाद नाका मार्केट यार्ड-जुना पूना नाका केगाव बायपासपासून पुढे जावे.
विजापूर रोडने रेल्वे स्टेशन व एसटी स्टॅण्डकडे जाण्यासाठी विजापूर नाका- आयटीआय पोलिस चौकी निर्मिती विहार- लिमयेवाडी चौक- सलगरवस्ती पोलिस ठाणे सलगरवाडी नागोबा मंदिर- रेल्वे स्टेशन मरिआई चौक-निराळे वस्ती ते हॉटेल अॅम्बेसेडर मार्गे पुढे जाता येईल.
रेल्वे स्टेशन ते एसटी स्टॅण्डकडे जाण्यासाठी रेल्वे स्टेशन- मोदी चौकी-मोदी बोगदा - रामवाडी दवाखाना - मरिआई चौक-निराळे वस्ती ते हॉटेल अॅम्बेसेडरपासून पुढे जाता येईल.
जुळे सोलापूर शहरात येणाऱ्या वाहनांना जुना पूना नाका-जुना तुळजापूर नाका जुना बोरामणी नाका- अशोक चौक मार्गे शहरात यावे लागेल.
बार्शीकडून सोलापुरात येणाऱ्या वाहनांना बार्शी टोल नाका, खेड मार्गे, केगाव ब्रिज पुना रोड ते पुढे असा मार्ग असेल.