सोलापूर : अनेकदा आयुष्यात संकटं आल्यावर काहीजण खचतात. तर काहीजण न खचता त्यावर मात करत आपली स्वप्न पूर्ण करतात. आज अशाच एका व्यक्तीची कहाणी आपण जाणून घेणार आहोत, ज्यांनी अंत्यत संघर्षमय प्रवास करत एक यशस्वी उद्योजक म्हणून सर्वांमसोर प्रेरणादायी उदाहरण सादर केले आहे.
वीरेंद्र विश्वनाथ हिंगमिरे असे या व्यक्तीचे नाव आहे. ते सोलापूर शहरातील भवानी पेठेतील रहिवासी आहे. त्यांच्या घरची परिस्थिती बेताची होते. त्यामुळे पुढचे शिक्षण घेता आले नाही. सुरुवातीला लहानपणापासूनच घरी अर्धा किलो व एक किलो मिठाचे पुडे तयार करून सायकलीवरून ते बाजारात विक्री केली आणि आई-वडिलांच्या संसाराला हातभार लावला. इतकेच नव्हे तर प्रसंगी लाकडाचे प्लायवुड गाडीतून उतरवून हमाली कामही केले. सोलापुरातील रेवणसिद्धेश्वर समाजसेवा मंडळ येथे ट्रॉली चालवताना अवघ्या 10 रुपयात भाड्याची गाडी उतरवण्याचे हमाली काम करीत त्यांनी संघर्ष केला.
advertisement
इच्छा असेल तर मार्ग दिसेल! तीन तरुणांची कमाल, खडकाळ जमिनीवर फुलवली ड्रॅगन फ्रुटची शेती
त्यांचे मामा वसंत मोदी यांच्या मंगल भांडारात मजुरी कामही त्यांनी केले. पण सचोटी, प्रामाणिकपणा या बळावर तेथील ग्राहकांचा विश्वास संपादन केला आणि मग पुढे 1998 मध्ये 'वीरेंद्र विश्वनाथ हिंगमिरे' या मंगल भांडार फर्मची स्थापना केली. प्रामाणिकपणा, नम्रता आणि जलद सेवा यामुळे केलेल्या कष्टाचे चीज होत गेले. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातच नव्हे तर इतर जिल्ह्यातही व्ही.व्ही.एच मंगल भांडार अब्बल ठरत छोट्याशा रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले.
कल्याणमधील असं दुकान, जिथं कायम असतो सेल; इथल्या ड्रेसेसला महिलांची खूपच पसंती
वीरेंद्र विश्वनाथ हिंगमिरे'यांच्या मंगल भंडारची वार्षिक उत्पन्न 48 लाख रुपयांपर्यंत होत आहे. आज आपल्या कष्टाने व जिद्दीने उद्योग क्षेत्रात 'वीरेंद्र विश्वनाथ हिंगमिरे मंगल भांडार, सोलापूर' या आपल्या फर्मचे नाव ते औद्योगिक क्षेत्रात यशस्वीरित्या गाजवत आहेत.