डिलिव्हरी बॉय इंद्रजित सिंह संधू हे मंगळवारी रात्री पिझ्झाची ऑर्डर देण्यासाठी रितेश अंपायर सोसायटीत आले होते. तेव्हा सोसायटीतील एका कुत्र्याने त्याच्यावर झडप घातली. स्वत:च्या बचावासाठी संधू यांनी लाकूड उचलून कुत्र्याला हुसकावले. मात्र, याच कारणावरून तिथे उपस्थित मद्यधुंद तरुण संतापले आणि त्यांनी संधू यांना मारहाण केली. यामध्ये संधू यांच्या तोंडाला गंभीर दुखापत झाली असून दात पडले आहेत.
advertisement
नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार, बोनस जाहीर, कुणाला किती मिळणार पैसे?
सीसीटीव्हीत घटना कैद
सोसायटीतील मारहाणीची ही घटना इमारतीच्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे. मात्र, कोळसेवाडी पोलिसांनी केवळ एका आरोपीविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे नागरिकांतून आश्चर्य आणि संताप व्यक्त केला जातोय. पीडित संधू यांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून त्यांच्या अटकेची मागणी केलीये.
मद्यधुंद तरुणांची दहशत
मिळालेल्या माहितीनुसार, सोसायटीतील हे तीन तरुण डिलिव्हरी घेऊन येणाऱ्या प्रत्येक डिलिव्हरी बॉयशी मुद्दामहून वाद घालतात. त्यांना त्रास देतात आणि मारहाण करतात. दारूच्या नशेत राहणाऱ्या या तरुणांची दहशत असून पोलिसांनी ती मोडीत काढावी, अशी मागणी होते आहे.