विद्युत प्रवाह सुरू केल्यानंतर या मार्गावर चाचणीपूर्व तयारी अधिक गतीने होईल. एमएमआरडीएने आनंद नगर जंक्शन येथे 6 मेट्रो डबे उन्नत रुळांवर यशस्वीपणे चढवले असून, ते डबे कासारवडवली स्थानकापर्यंत पोहोचवण्यात आले आहेत. आता या डब्यांची जोडणी करून सप्टेंबरमध्ये गाड्यांची चाचणी सुरू केली जाणार आहे.
Local Megablock: गणपती दर्शनासाठी बाहेर पडाल तर अडकाल! रेल्वे घेणार मेगाब्लॉक, कसं असेल वेळापत्रक?
advertisement
वडाळा – कासारवडवली – गायमुख या संपूर्ण मेट्रो प्रकल्पाचे काम झपाट्याने सुरू आहे. यात मेट्रो 4 ची लांबी 32.32 किमी असून 4अ मार्गाची लांबी 2.7 किमी आहे. यामध्ये कॅडबरी जंक्शन ते गायमुख दरम्यानचा टप्पा डिसेंबरपर्यंत प्रवाशांसाठी खुला करण्यात येणार आहे.
विद्युत प्रवाह कार्यान्वित झाल्यामुळे स्थानिक नागरिकांनी ओव्हरहेड वायरपासून सुरक्षित अंतर राखावे, असे आवाहन एमएमआरडीएकडून करण्यात आले आहे. डोंगरीपाडा–कॅडबरी जंक्शन दरम्यानचाही विद्युत प्रवाह लवकरच कार्यरत केला जाणार आहे. विद्युत चाचणी पूर्ण झाल्यानंतर, मेट्रो गाड्यांची यशस्वी चाचणी घेण्यात येईल. ही चाचणी सुरू झाल्यानंतर ठाण्यातून पहिल्यांदाच मेट्रो धावताना दिसणार आहे, ही गोष्ट ठाणेकरांसाठी अत्यंत आनंदाची आहे. अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या मेट्रो प्रवासाचे स्वप्न अखेर डिसेंबरमध्ये पूर्ण होणार आहे.