ही बंदी पिसे आणि टेमघर जलशुध्दीकरण केंद्रातील उच्चदाब सबस्टेशनमध्ये आवश्यक देखभाल, कंट्रोल पॅनलची दुरुस्ती, ट्रान्सफॉर्मर ऑईलचे फिल्ट्रेशन आणि इतर तांत्रिक कामांसाठी नियोजित करण्यात आली आहे. यामध्ये महापालिकेच्या स्वतःच्या पाणी योजनेचा शटडाऊन घेतला जाईल. मात्र, या कालावधीत स्टेम प्राधिकरणाचा पाणीपुरवठा झोननुसार सुरु ठेवण्यात येणार आहे.
advertisement
शटडाऊनमुळे घोडबंदर रोड, वर्तकनगर, ऋतुपार्क, जेल, गांधीनगर, रुस्तमजी, सिध्दांचल, समतानगर, सिध्देश्वर, इंटरनिटी, जॉन्सन आणि कळव्याचा काही भाग या ठिकाणी 12 तास पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील. याशिवाय पाणीपुरवठा पूर्वपदावर येईपर्यंत पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणी येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी आधीच आवश्यक तो पाण्याचा साठा करून ठेवावा.
महानगरपालिकेने नागरिकांना विनंती केली आहे की, या आवश्यक कामांसाठी सहकार्य करावे आणि पाण्याचा काटकसरीने वापर करावा. अधिक माहितीसाठी ठाणे महापालिकेच्या अधिकृत वेबसाईट www.thanecity.gov.in किंवा आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या क्रमांकावर संपर्क साधावा.