Pune News : प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, पिंपरी-चिंचवड ते कारवार नवीन एसटी बससेवा, कधीपासून धावणार बस?
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pooja Satyavan Patil
Last Updated:
चिंचवड ते कारवार (कर्नाटक) मार्गावर प्रवाशांच्या सोयीसाठी नवीन एसटी बससेवा सुरू होणार आहे.
पुणे: प्रवाशांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. स्थानक प्रमुख वैशाली कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचवड ते कारवार (कर्नाटक) मार्गावर प्रवाशांच्या सोयीसाठी नवीन एसटी बससेवा सुरू होणार आहे. ही सेवा 15 ऑक्टोबरपासून चालू होणार आहे. ही बस सकाळी 7 वाजता पिंपरी-चिंचवड (वल्लभनगर) स्थानकातून रवाना होईल, तर परतीची बस रात्री 9 वाजता कारवारहून निघणार आहे. प्रवाशांसाठी आरक्षणाची सुविधा देखील उपलब्ध राहणार आहे.
नवीन एसटी बससेवा सुरू झाल्यामुळे पिंपरी-चिंचवड ते कारवारदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. स्थानक प्रशासनाने प्रवाशांना या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. या नव्या बससेवेमुळे प्रवाशांना अधिक सोयीस्कर आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळणार आहे.
advertisement
कर्नाटकातून महाराष्ट्रात तसेच महाराष्ट्रातून कर्नाटकात प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मागील काही दिवसांत वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने पिंपरी-चिंचवड शहरातून कारवारकडे जाणारी नवीन बससेवा सुरू करण्यात आली आहे. या बस सेवेमुळे प्रवाशांची होणारी गैरसोय दूर होण्यास मदत होणार आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
October 14, 2025 9:43 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune News : प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, पिंपरी-चिंचवड ते कारवार नवीन एसटी बससेवा, कधीपासून धावणार बस?