प्रभादेवी स्थानकाजवळचा हा पूल पूर्व-पश्चिम दिशेने दोन्ही रेल्वे मार्ग ओलांडतो आणि थेट प्रभादेवी स्थानकाशी जोडलेला आहे. त्यामुळे पूर्व-पश्चिम दिशेने प्रवास करणारे तसेच परळ आणि केईएम रुग्णालयाच्या दिशेने जाणारे नागरिकांसाठी हा पूल अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. प्रभादेवीचा जुना पूल सुरक्षेच्या कारणास्तव काही महिन्यांपूर्वी बंद करण्यात आला होता. त्यामुळे नागरिकांना स्टेशन परिसर ओलांडण्यासाठी मोठा फेरा मारावा लागत होता. अनेकांना दैनंदिन प्रवासात अडचणींचा सामना करावा लागत होता. शाळा, कार्यालये आणि रुग्णालयात जाणेही कठीण बनले होते.
advertisement
कल्याणमधील प्रमुख मार्ग 20 दिवस बंद, कारण काय? पर्यायी मार्ग कोणते?
आता नवीन पूल सर्वांसाठी खुला होणार असल्याने ही समस्या पूर्णपणे दूर झाली आहे. नागरिकांना स्टेशन परिसर सहज पार करता येईल आणि प्रवासात वेळ वाचेल. या निर्णयामुळे प्रभादेवी आणि परळ परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. स्थानिकांनी पश्चिम रेल्वेच्या या निर्णयाचे स्वागत केले असून लवकरात लवकर पूल सुरू करण्याची मागणीही केली आहे.






