Mumbai Local: लोकल प्रवाशांचा वेळ वाचणार, कल्याण-कर्जत मार्गाबाबत मोठा निर्णय, 236 कोटींचा मेगाप्लॅन!

Last Updated:

Mumbai Local: कल्याण ते कर्जत लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. या मार्गावरील 10 रेल्वे क्रॉसिंगबाबत रेल्वे प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे.

Mumbai Local: लोकल प्रवाशांचा वेळ वाचणार, कल्याण-कर्जत मार्गाबाबत मोठा निर्णय, 236 कोटींचा मेगाप्लॅन!
Mumbai Local: लोकल प्रवाशांचा वेळ वाचणार, कल्याण-कर्जत मार्गाबाबत मोठा निर्णय, 236 कोटींचा मेगाप्लॅन!
ठाणे: कल्याण ते कर्जत रेल्वे प्रवास करणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. मध्य रेल्वेच्या कल्याण ते कसारा दरम्यान असणारे 10 रेल्वे क्रॉसिंग बंद करण्यात येणार आहेत. या 10 ठिकाणी रेल्वे पूल बांधण्यात येणार असून त्यामुळे लोकलच्या वक्तशीरपणात मोठी सुधारणा होणार आहे. तसेच प्रवाशांचा देखील वेळ वाचणार आहे. यासाठी 236 कोटींचा निधी खर्चण्यात येणार असल्याची माहिती आहे.
रेल्वे क्रॉसिंगमुळे रेल्वेच्या वक्तशीरपणावर परिणाम होत आहे. एक क्रॉसिंग गेट उघडून बंद करण्यासाठी सरासरी 3 ते 7 मिनिटे लागतात. एकदा फाटक उघडले की दोन्ही बाजूंच्या गाड्या रूळ ओलांडतात. सगळ्या गाड्या जाईपर्यंत लोकल थांबवावी लागते. त्याचा फटका रेल्वे प्रवासाला बसतो, असे अधिकारी सांगतात.
advertisement
दिवा हे उपनगरीय मार्गावरील वर्दळीचं स्थानक आहे. त्यामुळे या मार्गावर दिवसांतून सरासरी किमान 39 वेळा लेव्हल क्रॉसिंगसाठी फाटक उघडले जाते. त्याचा परिणाम येथून रोज धावणाऱ्या लोकलवर होतो. येथून रोज 894 लोकल धावतात. यातील 70 ते 75 टक्के लोकल या स्थानकावर थांबतात. याचा परिणाम रेल्वेच्या वक्तशीरपणावर होत असून नव्या निर्णयाचा याठिकाणी फायदा होणार आहे.
advertisement
दरम्यान, एका अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही 10 एलसी गेट बंद करण्यासाठी आणि आरओबी बांधण्यासाठी आधीच निविदा मागवल्या आहेत. ज्यामुळे रेल्वेचे कामकाज आणखी सुधारेल. डिसेंबरपर्यंत या कामांसाठीची प्रक्रिया होईल. हे एलसी गेट मुंबईच्या उपनगरीय रेल्वे कॉरिडॉरच्या शेवटच्या टोकावर असले तरी, खोपोली आणि कर्जतहून सीएसएमटीकडे येणाऱ्या गाड्यांवर त्यांचा परिणाम होत होता.
view comments
मराठी बातम्या/ठाणे/
Mumbai Local: लोकल प्रवाशांचा वेळ वाचणार, कल्याण-कर्जत मार्गाबाबत मोठा निर्णय, 236 कोटींचा मेगाप्लॅन!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement