कुठे घडली घटना
अपघाताची माहिती मिळताच, पोलीस, NDRF, स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली असून रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. रुद्रप्रयाग इथे बस अपघातातील गंभीर जखमींना एअर अॅम्ब्युलन्सद्वारे ऋषिकेश एम्स इथे उपचारासाठी दाखल करण्यात आलं. रुद्रप्रयाग जिल्ह्यात झालेल्या भीषण बस अपघातात खासगी बसचा अद्याप पत्ता लागलेला नाही. अपघाताच्या वेळी या मिनी बसमध्ये चालकासह एकूण 20 जण प्रवास करत होते.
advertisement
महाराष्ट्रातील भाविकांवर काळाचा घाला
हे सर्व प्रवासी गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशचे होते आणि चालक हरिद्वारचा रहिवासी होता. अपघातात चालकासह आठ प्रवासी जखमी झाले आहेत, तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. नऊ प्रवासी अजूनही बेपत्ता आहेत. त्यांचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे. वातावरण खराब असल्यामुळे बचाव कार्यात अनेक अडथळे येत आहेत. मिनी बस आणि बेपत्ता लोकांचा शोध युद्धपातळीवर घेतला जात आहे.
बेपत्ता प्रवाशांची नावं
1 रवी भावसार, रा. उदयपूर, शास्त्री सर्कल, राजस्थान, वय 28 वर्षे.
2- माऊली सोनी, रा. एफ 601 सिलिकॉन पॅलेस बॉम्बे मार्केट, पुणे कुंभरिया रोड गुजरात, वय 19 वर्षे.
3- ललितकुमार सोनी, रा. प्रताप चौक गोगुंडा, राजस्थान, वय 48 वर्षे.
4- गौरी सोनी, रा. वीर सावरकर मार्ग, प्रभाग क्रमांक 12 राजगड राजगड, तहसील सदरपूर, मध्य प्रदेश, वय 41 वर्षे.
5- संजय सोनी, रा. उदयपूर, शास्त्री सर्कल राजस्थान, वय 55 वर्षे.
6- मयुरी, सुरत, गुजरात, वय 24 वर्षे.
7- चेतना सोनी, उदयपूर राजस्थान, वय 52 वर्षे.
8- चेतना, रहिवासी ई 202 पर्वत सिलिकॉन पॅलेस, आयमाता चौक सुरत, गुजरात, वय 12 वर्षे.
9- कट्टा रंजना अशोक, रा. ठाणे मीरा रोड, महाराष्ट्र, वय 54 वर्षे.
10- सुशीला सोनी, रा. शास्त्री सर्कल, उदयपूर, राजस्थान, वय 77 वर्षे.
अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांची नावं
1- दीपिका सोनी, रा. सिरोही मीना वास, राजस्थान, वय 42 वर्षे.
2- हेमलता सोनी, रा. प्रताप चौक, गोगुंडा गोगुंडा, राजस्थान, वय 45 वर्षे.
3- ईश्वर सोनी, रा. ई 202 पर्वत सिलिकॉन पॅलेस, अर्चना शाळेजवळ, गुजरात, वय 46 वर्षे.
4- अमिता सोनी, रहिवासी 701,702 बिल्डिंग नंबर 3 मीरा रोड, महाराष्ट्र, वय 49 वर्षे.
5- सोनी भावना ईश्वर, रहिवासी ई 202 पर्वत सिलिकॉन पॅलेस, अर्चना शाळेजवळ, गुजरात, वय 43 वर्षे.
6 - भव्य सोनी, रहिवासी ई 202 सिलिकॉन पॅलेस, बॉम्बे मार्केट, अर्चना शाळेजवळ, गुजरात, वय 07 वर्षे.
7- पार्थ सोनी, रहिवासी प्रभाग क्रमांक 11, राजगड, वीर सावरकर मार्ग गाव राजगड मध्य प्रदेश, वय 10 वर्षे.
8- सुमित कुमार (चालक), नरेश कुमार यांचा मुलगा, रा. बैरागी कॅम्प, हरिद्वार, वय 23 वर्षे.
उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग येथे बस अलकनंदा नदीत पडल्यानंतर, लोकांचा शोध घेण्यासाठी बचाव कार्य सुरू आहे. घटनास्थळी सोनार उपकरणे पाठवण्यात आली आहेत. अलकनंदा नदीत बेपत्ता बसचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. ध्वनी लहरींद्वारे मिनी बस नेमकी कुठे आहे ते शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. नदीत पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने अडथळा येत आहे.
रस्त्याने चालत होती, अचानक अंगावर आली बस, जीव वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न, 5 सेकंदात सगळं संपलं
बस चालकाने सांगितलं नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 8 ते 9 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, ज्यांवर उपचार सुरू आहेत. चालकाने सांगितले की आम्ही केदारनाथहून बद्रीनाथला जात होतो. त्यानंतर एका ट्रकने आमच्या बसला धडक दिली आणि ट्रक चालक घटनास्थळावरून पळून गेला. धडकेनंतर बस नियंत्रणाबाहेर गेली आणि नदीत पडली.