पुणे : सध्या विधानसभा निवडणुकांची सर्वत्र रणधुमाळी सुरु असून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंडो ऍथलेटिक सोसायटी तर्फे मतदार जागृती अभियान सध्या चालू आहे. शहरातली आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रात काम करणारी इंडो ऍथलेटिक संस्था ही गेली 15 वर्ष झालं हा उपक्रम राबवत आहे. या रॅलीमध्ये अनेक सायकल स्वार देखील सहभागी होत मतदानाविषयी जनजागृती करत असतात.
advertisement
मतदान हा प्रत्येक भारतीय नागरिकांचा प्राथमिक हक्क असून तो नागरिकांनी बजावला पाहिजे. त्यामुळे लोकशाहीला बळकटी ही मिळत असते आणि म्हणूनच अनेक सामाजिक संस्था या पुढे येत असे वेगवेगळे उपक्रम हे सातत्याने राबवताना पाहिला मिळतात. असंच इंडो ऍथलेटिक संस्था अनेक वर्ष काम करत आहे.
महायुती की महाविकास आघाडी, पुणेकरांचे विचार काय? तुळशीबागेत निवडणुकीची रंगली चर्चा
लोकसभेला ज्या प्रमाणे हे अभियान केलं. त्याच प्रमाणे आता विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पिंपरी चिंचवडमधील पिंपरी विधानसभा, भोसरी विधानसभा आणि चिंचवड विधानसभा या तिन्ही विधानसभा क्षेत्रातून जाणारी रॅली आयोजित केली आहे. तसेच पुणे शहरामध्ये देखील अशा स्वरूपाची रॅली काढली जात आहे.
मुंबईतील प्रसिद्ध चायनिज मंदिरात भविष्य पाहण्यासाठी होते गर्दी, काय आहे परंपरा?
आता दोनशेहुन अधिक लोक हे सहभागी झाले असून जवळपास संपूर्ण शरातून 600 लोक हे सहभागी होत असतात. मतदानाच्या दिवशी अनेक लोक ही सुट्टीवर जात असतात. तो आपला प्राथमिक अधिकार आहे. भारतातील लोकशाही ही जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आहे असून ती टिकली पाहिजे. यासाठी मतदानाच्या दिवशी कुठली सुट्टी न घेता आवर्जून प्रत्येकाने आपला मतदानाचा जो हक्क आहे बजवाब यासाठी आम्ही गेले अनेक वर्ष झालं ही रॅली काढत आहोत, अशी माहिती इंडो ॲथलेटिक सोसायटीचे अध्यक्ष गजानन खैरे यांनी दिली आहे.





