TRENDING:

Poultry Farming: नोकरीत काय आहे? MBA पास तरुणाने बिझनेसमध्ये लावलं डोकं, कमाई लाखात!

Last Updated:
Business Success: सध्याच्या काळात अनेक तरुण शेतीसोबत शेतीपुरक व्यवसायाकडे वळत आहेत. छत्रपती संभाजीनगरमधील तरुणाने नोकरी सोडून कुक्कुटपालन सुरू केलंय.
advertisement
1/5
Poultry Farm: नोकरीत काय आहे? MBA पास तरुणाने बिझनेसमध्ये लावलं डोकं, कमाई लाखात
सध्याच्या काळात काही तरुण नोकरीच्या मागे न लागता स्वत:चा बिझनेस करण्याचा विचार करतात. छत्रपती संभाजीनगरमधील उच्चशिक्षित तरुणाने 1 लाख पगाराची नोकरी सोडून मालक होण्याचा निर्णय घेतला.
advertisement
2/5
एमबीए झालेल्या संदीप दाभाडे याने कुक्कुटपालन व्यवसाय सुरू केला. त्याच्याकडे 5 हजार पक्षी असून तो चांगली कमाई करत आहे. याबाबतच संदीप यांनी लोकल18 सोबत बोलताना माहिती दिलीये.
advertisement
3/5
संभाजीनगरमधील शेकटा येथील संदीप दाभाडे याने एमबीएचं शिक्षण घेतलं. पुणे विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने एचआर म्हणून मोठ्या कंपनीत लाखाच्या पगाराची नोकही होती. परंतु, दुसऱ्याच्या हाताखाली काम करण्यापेक्षा स्वत:चा बिझनेस करून मालक होण्याचा निर्णय संदीप यांनी घेतला. 2 वर्षांपूर्वी कुक्कुटपालन व्यवसाय सुरू केला. आता या व्यवसायातून त्यांचा उदरनिर्वाह सुरू आहे.
advertisement
4/5
संदीप यांनी गावातच कुक्कुटपालनासाठी शेड उभारला. त्यांच्याकडे 5 हजार गावरान पक्षी आहेत. दर तीन महिन्यांनी त्यांची विक्री केली जाते. तर अंड्यांची देखील विक्री होत असते. सर्व खर्च वजा जाता महिन्याला 40 ते 50 हजार रुपयांपर्यंत कमाई होते. पण कुणाच्या हाताखाली काम न करता स्वत:चा बिझनेस समाधान देणारा ठरतोय, असे संदीप सांगतात.
advertisement
5/5
दरम्यान, शहरासह जिल्हाभरातील शेतकरी, व्यापारी, पोल्ट्री फॉर्मला येऊन मोल भाव करून पक्षी घेऊन जातात. सध्या पक्ष्यांना बनवलेले अन्न 50 टक्के आणि बाजारात मिळणारे भाजी मंडईतील 50 टक्के असे देऊन त्यांचे संगोपन केले जाते. तसेच अंडी, थेट कोंबडी विक्री स्थानिक ग्राहकांच्या मागणीमुळे त्यांचा व्यवसाय अधिक वाढत चालला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/कृषी/
Poultry Farming: नोकरीत काय आहे? MBA पास तरुणाने बिझनेसमध्ये लावलं डोकं, कमाई लाखात!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल