TRENDING:

Money Mantra: गुरुवारी विष्णू कृपा फळास येईल! या 5 राशींचे लोक होणार लखपती

Last Updated:
Money Horoscope Marathi: आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं गुरुवारच्या दिवसाचं (23 मे 2024) राशीभविष्य
advertisement
1/12
Money Mantra: गुरुवारी विष्णू कृपा फळास येईल! या 5 राशींचे लोक होणार लखपती
मेष (Aries) : बिझनेस अ‍ॅक्टिव्हिटीज सर्वसाधारण असतील. अधिक कष्ट करूनही फळ मात्र कमी मिळण्याची परिस्थिती असेल. अधिकाऱ्यांशी चांगले संबंध असल्यामुळे तुम्हाला सरकारी संस्थेशी निगडित एखादी मोठी ऑर्डर किंवा सरकारी टेंडर मिळू शकेल.उपाय : शिवलिंगावर जलाभिषेक करा.
advertisement
2/12
वृषभ (Taurus) : प्रॉपर्टीशी निगडित कोणतंही डील फायनल करण्यापूर्वी कागदपत्रं तपासा. मार्केटिंगशी संबंधित कामांमध्ये तुमचा बराचसा वेळ व्यतीत होईल. रखडलेलं पेमेंट मिळेल. अतिरिक्त कामामुळे नोकरदार व्यक्ती ताणाखाली असतील.उपाय : तुमच्यासोबत पिवळ्या रंगाची वस्तू ठेवल्यास चांगलं राहील.
advertisement
3/12
मिथुन (Gemini) : बिझनेस अ‍ॅक्टिव्हिटीजवर लक्ष ठेवणं महत्त्वाचं आहे. कर्मचाऱ्यांमध्ये परस्परांमध्ये काही वाद असतील. त्याचा परिणाम त्यांच्या कार्यक्षमतेवर होईल. फोनवर एखादी मोठी ऑर्डर येऊ शकेल.उपाय : शनिदेवाची उपासना करत राहा.
advertisement
4/12
कर्क (Cancer) : बिझनेसशी संबंधित अ‍ॅक्टिव्हिटीजमध्ये फोनवर किंवा मीटिंगमध्ये सकारात्मक चर्चा होईल. ती फायद्याची ठरेल. नोकरदार व्यक्तींच्या ऑफिसमध्ये गेट-टुगेदरशी संबंधित कार्यक्रम होईल.उपाय : बजरंगबली हनुमानाची उपासना करत राहा.
advertisement
5/12
सिंह (Leo) : मीडिया आणि ऑनलाइन कामांसंदर्भातल्या बिझनेसमध्ये यशस्वी व्हाल. थोड्या प्रमाणात केलेले कष्टही बरंच यश मिळवून देतील. वेळ अनुकूल आहे. त्याचा योग्य तो वापर करा. काम करताना सावध राहा.उपाय : शनीला दान करा. ते चांगलं राहील.
advertisement
6/12
कन्या (Virgo) : बिझनेसच्या अनुषंगाने काळ फारसा अनुकूल नाही. नवं काम सुरू करण्यापेक्षा सध्याच्या कामांवरच लक्ष केंद्रित केलेलं चांगलं राहील. पार्टनरशिपमध्ये पारदर्शकता राखा. अन्यथा विनाकारण वाद होऊ शकतात.उपाय : शनिदेवाची उपासना करत राहा.
advertisement
7/12
तूळ (Libra) : कामाच्या ठिकाणी मॅन्युफॅक्चरिंगशी निगडित कामांकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. मार्केटिंगमध्ये आणि उत्पादनाचा दर्जा वाढवण्यामध्ये तुमचा जास्तीत जास्त वेळ व्यतीत करा. चिटफंड कंपन्यांशी निगडित कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणं टाळा. बिझनेस चांगला राहील.उपाय : निळ्या रंगाच्या वस्तू दान केल्यास चांगलं राहील.
advertisement
8/12
वृश्चिक (Scorpio) : दुर्लक्ष केल्यामुळे एखादं सरकारी प्रकरण प्रलंबित राहू शकतं. पैशांच्या गुंतवणुकीसंदर्भातल्या कामामध्ये दुसऱ्या कोणाच्या बोलण्यात गुंतू नका. स्वतः पूर्ण तपास करा. नोकरीत उद्दिष्टपूर्तीसाठी या वेळी बरेच कष्ट करावे लागणार आहेत.उपाय : लाल रंगाची वस्तू तुमच्यासोबत ठेवा आणि हनुमानाची उपासना करत राहा.
advertisement
9/12
धनू (Sagittarius) : बिझनेसविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीशी चर्चा करा. तुमच्याकडून सध्या घेतलेले निर्णय चुकीचेही ठरू शकतात. सरकारी नोकरीत असलेल्या व्यक्तींना नोकरीच्या संदर्भातली एखादी चांगली बातमी अचानक मिळू शकेल.उपाय : कालिमातेची उपासना करत राहा.
advertisement
10/12
मकर (Capricorn) : सध्या बिझनेसमधली परिस्थिती तुम्हाला पूर्णपणे अनुकूल आहे. त्या परिस्थितीचा चांगला वापर करून घ्या. बिझनेसची परिस्थिती सुधारेल. असूयेच्या भावनेमुळे नोकरीच्या ठिकाणचे सहकारी तुम्हाला दुखावू शकतात/त्रास देऊ शकतात, हे लक्षात घ्या.उपाय : श्री गणेशाची उपासना करत राहा. तुमच्यासोबत हिरव्या रंगाच्या वस्तू ठेवा.
advertisement
11/12
कुंभ (Aquarius) : आज बिझनेसची व्याप्ती वाढवण्यासाठी किंवा कोणतंही नवं काम सुरू करण्यासाठी वेळ खूप अनुकूल आहे. शेअरसारख्या कामांमध्ये तोटा होऊ शकतो. पगारदार व्यक्तींना चांगली बातमी किंवा बोनस मिळू शकतो.उपाय : निळ्या रंगाच्या वस्तू दान करणं चांगलं राहील.
advertisement
12/12
मीन (Pisces) : बिझनेसच्या अनुषंगाने ग्रहस्थिती फारशी चांगली नाही. कोणताही महत्त्वाचा निर्णय घेण्यापूर्वी अनुभवी व्यक्तींकडून मार्गदर्शन घेतलं पाहिजे. सरकारी नोकरीत असलेल्यांनी त्यांच्या कामात कोणतीही हयगय करू नये.उपाय : घरातून बाहेर पडताना वडिलधाऱ्या मंडळींचा आशीर्वाद घेऊनच बाहेर पडा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Money Mantra: गुरुवारी विष्णू कृपा फळास येईल! या 5 राशींचे लोक होणार लखपती
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल