TRENDING:

Astrology: राहुचे शततारका नक्षत्रात गोचर! बारापैकी 3 राशींच्या लोकांना धमाकेदार ऑफर मिळणार

Last Updated:
Astrology Marathi: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, राहू ग्रहाला कठोर वाणी, जुगार, प्रवास, चोरी, दुष्ट कर्मे, त्वचेचे रोग, इत्यादींचा कारक मानलं जातं. राहू ग्रह वेळोवेळी राशीसोबत नक्षत्रही बदलतो, ज्याचा परिणाम मानवी जीवनावर म्हणजेच सगळ्या राशीचक्रावर दिसून येतो.
advertisement
1/6
राहुचे शततारका नक्षत्रात गोचर! बारापैकी 3 राशींच्या लोकांना धमाकेदार ऑफर मिळणार
नोव्हेंबर महिन्यात राहू ग्रह शततारका (शतभिषा) नक्षत्रात प्रवेश करणार आहे. या नक्षत्राचा स्वामी राहू ग्रहच आहे. त्यामुळे राहू ग्रहाचा स्वतःच्या नक्षत्रात झालेला हा प्रवेश काही राशींसाठी अत्यंत शुभ आणि लाभदायक सिद्ध होऊ शकतो. या राशीच्या लोकांना उत्पन्न वाढणे आणि करिअरमध्ये प्रगती होण्याचे योग तयार होत आहेत. त्याचबरोबर अचानक धनलाभ होण्याचीही शक्यता आहे.
advertisement
2/6
मकर रास - राहू ग्रहाचे नक्षत्र परिवर्तन मकर राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते. या काळात तुम्हाला तुमच्या कामात आणि व्यवसायात विशेष यश मिळू शकते. तसेच, करिअरमध्ये असे नवीन संधी मिळतील जे तुम्हाला नव्या उंचीवर घेऊन जाऊ शकतात. तुम्हाला मोठ्या प्रमाणात धनलाभ होण्याचीही शक्यता आहे. कंपन्यांमध्ये उच्च पदांवर कार्यरत असलेल्या लोकांना नेतृत्वाच्या नवीन संधी मिळू शकतात. विदेश यात्रा किंवा विदेशाशी संबंधित कामांमध्येही यश मिळू शकते. तसेच, या काळात तुम्हाला वेळोवेळी आकस्मिक धनलाभ होण्याची शक्यता आहे. 
advertisement
3/6
मिथुन रास - राहू ग्रहाचे नक्षत्र परिवर्तन तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकते. कारण राहू ग्रह तुमच्या राशीतून उत्पन्न आणि लाभाच्या स्थानातून भ्रमण करत आहे. त्यामुळे या काळात तुमच्या उत्पन्नात जबरदस्त वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच, करिअरच्या क्षेत्रात नवीन संधी मिळू शकतात, ज्यामुळे पदोन्नतीचे योग बनू शकतात.
advertisement
4/6
मिथुन राशीच्या लोकांना व्यापारातही नफा होण्याची शक्यता आहे आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते. या काळात गुंतवणुकीतून लाभ मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात नवीन संधी समोर येतील आणि तुमचे कोणतेही जुने रखडलेले प्रोजेक्ट आता गती पकडू शकेल.
advertisement
5/6
वृषभ रास - राहू ग्रहाचे नक्षत्र परिवर्तन वृषभ राशीच्या लोकांसाठी सकारात्मक ठरू शकते. कारण राहू ग्रह तुमच्या राशीतून कर्म भावात (दहावे स्थान) भ्रमण करत आहेत. या काळात तुम्हाला वेळोवेळी अचानक धनलाभ होऊ शकतो. तसेच कार्यस्थळी तुम्हाला कामामध्ये खूप समाधान मिळेल आणि तुमचे नशीबही उजळून निघेल.
advertisement
6/6
या दरम्यान वृषभ राशीच्या लोकांच्या व्यावसायिक जीवनात स्थिरता आणि प्रगती येईल. जे लोक नवीन व्यवसाय सुरू करू इच्छितात, त्यांच्यासाठी हा काळ उत्तम राहील. कंपन्यांमध्ये उच्च पदांवर कार्यरत असलेल्या लोकांना नेतृत्वाच्या नवीन संधी मिळू शकतात. परदेश प्रवास किंवा परदेशाशी संबंधित कामांमध्येही यश मिळू शकते. जे लोक आयटी क्षेत्र, एआय (AI) आणि इंटरनेटशी संबंधित आहेत, त्यांना चांगला लाभ मिळू शकतो. या काळात तुमचे तुमच्या वडिलांशी असलेले संबंधही चांगले राहतील.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Astrology: राहुचे शततारका नक्षत्रात गोचर! बारापैकी 3 राशींच्या लोकांना धमाकेदार ऑफर मिळणार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल