Astrology: मोठा संघर्ष सोसला! या 5 राशींचे आता नशीब चमकणार; ग्रहणादिवशीच शुक्र-मंगळाची विशेष साथ
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Daily Horoscope, Aajche Rashi Bhavishya, September 07, 2025 By Chirag Daruwalla: ग्रहांची गती आणि नक्षत्रांची स्थिती यांच्या आधारे सर्व राशींचं दैनिक राशिभविष्य सांगितलं जातं. ज्योतिषी चिराग दारूवाला यांच्याकडून ते जाणून घेऊ या.
advertisement
1/12

मेष (Aries) : रविवारचा दिवस प्रतिकूल आहे. महत्त्वाची कामं करताना अडचणी येतील. कौटुंबिक संबंध नीट राखण्यावर भर द्यावा लागेल. आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक दृष्टिकोनातून दिवस आव्हानात्मक ठरू शकतो. त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवा. नोकरदारांना कामावर लक्ष केंद्रित करावे लागेल अन्यथा कामात विलंब होऊ शकतो आणि दिवसभर काम करावं लागू शकतं. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. प्रियजनांसोबत वेळ घालवल्यास मानसिक शांती आणि आनंद मिळेल.Lucky Color : RedLucky Number : 12
advertisement
2/12
वृषभ (Taurus) : आज रविवारचा दिवस संमिश्र असेल. काही नवीन गोष्टी शिकू शकाल. या गोष्टी तुम्हाला वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात फायदेशीर ठरतील. तुमचे कष्ट फलदायी ठरतील. तुम्ही तुमच्या कल्पना शेअर करू शकाल. मित्र आणि कुटुंबियांसोबत वेळ घालवल्यास तुम्हाला मानसिक शांती मिळेल. सामाजिक वर्तुळ विस्तारेल. नवीन संपर्क जोडण्याची संधी मिळेल.Lucky Color : MaroonLucky Number : 10
advertisement
3/12
मिथुन (Gemini) : कामे होतील, आजचा दिवस संवेदनशील आणि संवादासाठी चांगला आहे. नवीन कल्पनांमुळे तुम्ही आघाडीवर राहू शकणार नाही. जवळच्या व्यक्तींसोबतच्या नातेसंबंधात नवीन ऊर्जा मिळेल. संवाद कौशल्य प्रभावी असल्याने तुमचे विचार स्पष्टपणे मांडण्याचा प्रयत्न करा. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा. छोटी गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते. मोठे निर्णय काळजीपूर्वक घ्या. योगा आणि ध्यानधारणा केल्याने तुमची मानसिक आणि शारीरिक ऊर्जा वाढेल. सर्जनशीलता चांगली असेल. नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी दिवस चांगला आहे.Lucky Color : OrangeLucky Number : 4
advertisement
4/12
कर्क (Cancer) : आज रविवारचा दिवस संवेदनशील आणि भावनिक असेल. कुटुंब आणि प्रियजनांसोबत वेळ घालवावा असं वाटेल. तुमची अंतर्दृष्टी तुम्हाला योग्य दिशा दाखवेल. त्यामुळे प्रत्येक निर्णय मनापासून घ्या. ऑफिसमध्ये सहकाऱ्यांकडून सहकार्य मिळेल. आर्थिक स्थिती चांगली असेल, पैशाची उधळपट्टी टाळा. मानसिक शांतीसाठी ध्यानधारणा करा. थोडावेळ विश्रांती घ्या. आध्यात्मिक कार्यात सहभाग घेतल्याने मनःशांती मिळेल.Lucky Color : WhiteLucky Number : 8
advertisement
5/12
सिंह (Leo) : आज रविवारचा दिवस संमिश्र असून संधी देणारा आहे. तुमचा आत्मविश्वास आणि हुशारी लक्षवेधी ठरेल. कामात मेहनत आणि समर्पणाचे फळ मिळेल. थोडा संयम ठेवा. नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी दिवस अनुकूल आहे. नात्यात सकारात्मक बदल दिसून येतील. कुटुंबासोबत वेळ घालवण्याची तसेच भावनिक बंध मजबूत करण्याची संधी मिळेल.Lucky Color : Navy BlueLucky Number : 14
advertisement
6/12
कन्या (Virgo) : आजचा दिवस कल्पना आणि योजनांच्या बाबतीत उत्साहवर्धक असेल. तुमची बुध्दिमत्ता आणि विश्लेषणात्मक क्षमता विश्वासार्ह ठरेल. कामात प्रगती करण्यासाठी प्रयत्न कराल. व्यवसायात नवीन सुरुवात करण्यासाठी दिवस शुभ आहे. आरोग्याबाबत तुमचे विचार सकारात्मक असतील. वैयक्तिक जीवनात प्रेम आणि नातेसंबंधात सुसंवाद निर्माण करण्याचे प्रयत्न यशस्वी ठरतील. जवळच्या लोकांशी संवाद साधा आणि त्यांच्या भावना समजून घ्या. नाती मजबूत करण्यासाठी दिवस चांगला आहे.Lucky Color : MagentaLucky Number : 6
advertisement
7/12
तूळ (Libra) : आज रविवारी सर्जनशीलता चांगली असेल. जुन्या मित्राकडून अनपेक्षित मदत मिळू शकते. यातून नवीन शक्यता दृष्टीक्षेपात येतील. आरोग्याची काळजी घ्या. नियमित व्यायाम आणि संतुलित आहाराला प्राधान्य द्या. मन शांत आणि केंद्रित असल्याने निर्णय घेऊ शकाल. विचार स्पष्टपणे व्यक्ती करू शकाल. तुमचे हेतू इतरांसमोर चांगल्या प्रकारे मांडू शकाल.Lucky Color : BlueLucky Number : 3
advertisement
8/12
वृश्चिक (Scorpio) : रविवारचा दिवस अनेकदृष्ट्या अनुकूल आहे. कामं वेळेत पूर्ण होतील याची काळजी घ्या. घाईत महत्त्वाचे निर्णय घेऊ नका. कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्या. अनिश्चिततेचा सामना करावा लागू शकतो. विचार नीट मांडा आणि मगच निर्णय घ्या. आरोग्याची काळजी घ्या. मेहनत करावी लागेल. प्रियजनांशी संवाद साधत वेळ घालवल्यास नातं आणखी घट्ट होईल.Lucky Color : PInkLucky Number : 11
advertisement
9/12
धनू (Sagittarius) : आजचा दिवस उत्तम आहे. संस्मरणीय दिवसांपैकी एक ठरेल. महत्त्वाची अपूर्ण इच्छा पूर्ण होईल. तुमचे मन खूप आनंदी असेल. त्याचा आरोग्यावर चांगला परिणाम दिसेल. एखाद्या प्रकल्पात अडकून रहाल. संध्याकाळी सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. प्रेम जीवनातील रहस्ये समजून घेण्याचा प्रयत्न कराल. नातेसंबंधांत स्पष्टता येण्यासाठी योग्य विश्लेषण कराल.Lucky Color : BrownLucky Number : 2
advertisement
10/12
मकर (Capricorn) : आज रविवारचा दिवस नवीन संधी घेऊन येईल. सहकार्यांसोबत चांगला समन्वय ठेवल्यास नवीन कल्पना सुचतील. यामुळे योजना आणखी चांगल्या आखू शकाल. वैयक्तिक जीवनात भावना व्यक्त करा. प्रियजनांसोबत वेळ घालवल्यास मानसिक शांती मिळेल. आरोग्यासाठी ध्यानधारणा आणि योगासने करा.Lucky Color : Sky BlueLucky Number : 11
advertisement
11/12
कुंभ (Aquarius) : आज रविवारचा दिवस संमिश्र असेल. नवीन प्रकल्पावर लक्ष केंद्रित केल्यास विचारांना नवीन दिशा मिळेल. तुमची सकारात्मक ऊर्जा तुमच्या कल्पना मांडण्याची आणि इतरांना प्रेरणा देण्याची संधी देईल. वैयक्तिक संबंधात परस्पर सामंजस्य आणि सहकार्य वाढवा. कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवल्यानं मानसिक स्थिरता मिळेल. जुन्या मित्राला भेटल्याने सुखद अनुभव मिळेल. आर्थिक गोष्टीत सावधगिरी बाळगा. अनपेक्षित खर्च होऊ शकतो.Lucky Color : GreenLucky Number : 5
advertisement
12/12
मीन (Pisces) : रविवारचा दिवस संवेदनशील अनुभव देणारा असेल. लेखन किंवा कलेत हात आजमावण्यासाठी दिवस चांगला आहे. कौटुंबिक पातळीवर सकारात्मकता असेल. तुमच्या भावना इतरांसोबत मोकळेपणाने व्यक्त करा. यामुळे तुमचे नाते मजबूत होईल. ऑफिसमध्ये सहकार्याची भावना असेल. त्यामुळे टीमसोबत तुम्ही नवीन उंची गाठू शकाल. आरोग्यासाठी थोडा वेळ विश्रांती घ्या. दिनचर्येत ध्यानधारणा किंवा योगाचा समावेश केल्यास मानसिक शांती मिळेल.Lucky Color : YellowLucky Number : 7
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Astrology: मोठा संघर्ष सोसला! या 5 राशींचे आता नशीब चमकणार; ग्रहणादिवशीच शुक्र-मंगळाची विशेष साथ