Yakuza Karishma EV : उन्हामध्ये किती दिवस बाइक चालवणार? पेट्रोल न भरता या कारमध्ये तिघे आरामात फिरा
- Published by:Shreyas
- trending desk
Last Updated:
कार विकत घेणं ही सर्वसामान्यांसाठी अवघड गोष्ट असते. कारचे मार्केटमध्ये अनेक पर्याय आता उपलब्ध असले, तरी कार विकत घेऊन तिचा मेंटेनन्स ठेवणं खर्चिक असतं. पण आता कमी बजेटमध्येदेखील कार घेण्याचं स्वप्न पूर्ण करता येऊ शकतं.
advertisement
1/7

भारतातले रस्ते व ट्रॅफिक यातून वाट काढेल अशी इलेक्ट्रिक कार हवी असेल, तर याकुझा करिष्मा ईव्ही हा चांगला पर्याय ठरू शकतो. विशेष म्हणजे ही कार एका बाईकच्या बजेटमध्ये मिळू शकते. अगदी दोन लाख रुपयांपासूनही ती मिळू शकते.
advertisement
2/7
भारतीय बाजारातील सर्वांत स्वस्त व सर्वांत छोट्या कारमध्ये याकुझाच्या करिष्माचा समावेश होतो. ही मिनी इलेक्ट्रिक कार आहे. एखाद्या बाईकच्या किमतीएवढी किंवा त्यापेक्षा कमी किमतीत ही कार मिळू शकते. या कारमध्ये तीन व्यक्ती बसू शकतात.
advertisement
3/7
एकदा चार्ज केल्यावर ती 60 ते 70 किलोमीटर अंतर पार करू शकते. ही कार पूर्ण चार्ज करण्यासाठी सहा ते सात तासांचा कालावधी लागतो. टाटा नॅनो आणि MG कॉमेट ईव्ही या गाड्यांशी ही कार जोरदार स्पर्धा करते.
advertisement
4/7
याकुझा करिष्मा कारचं डिझाईन उत्तम आहे. कारला स्टायलिश फ्रंट ग्रिल आहे. मॉर्डन एलइडी हेडलॅम्प कारला लावलेले आहेत. कारमध्ये एलइडी DRL चा प्रयोगही करण्यात आलाय. कारला अॅडजस्टेबल साइड मिरर आहेत. कारची न्यू जनरेशन अॅलॉय व्हिल्स कारला स्टायलिश लूक देतात.
advertisement
5/7
या कारमध्ये मल्टी स्पीड स्मार्ट डिझाईन करण्यात आलंय. अनेक आधुनिक फिचर्स कारमध्ये देण्यात आली आहेत. या कारला व्हेंटिलेटेड रूफ दिलेलं आहे. यात तीन व्यक्ती आरामात बसून प्रवास करू शकतात. तसंच कारमध्ये दोन एअर ब्लोअर दिलेले आहेत. या कारला रिव्हर्स कॅमेऱ्याचं फिचरही देण्यात आलंय.
advertisement
6/7
याकुझा ईव्हीच्या अधिकृत वेबसाईटवरून ही कार बुक करता येऊ शकते. या कारची किंमत एक लाख 75 हजार रुपये इतकी आहे. ही मिनी कार असल्यानं यात तीन व्यक्तीच प्रवास करू शकतात. या कारच्या बॅटरीची क्षमता 60v45ah आहे. या कारमध्ये टाइप-2 चार्जरचं कनेक्शन देण्यात आलंय.
advertisement
7/7
बजेटफ्रेंडली व भारतीय रस्त्यांवरील ट्रॅफिकमधून वेगानं वाट काढू शकेल अशी ही इलेक्ट्रिक कार आहे. एखाद्या बाईकच्या किमतीतही ती मिळू शकते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
Yakuza Karishma EV : उन्हामध्ये किती दिवस बाइक चालवणार? पेट्रोल न भरता या कारमध्ये तिघे आरामात फिरा