EV Policy Maharashtra: खूशखबर, महाराष्ट्रात ईलेक्ट्रिक वाहनांना टोल माफ, 100 टक्के मिळणार लोन!
- Published by:sachin Salve
Last Updated:
महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. अखेरीस राज्य सरकारने महायुती सरकारला मंजुरी दिली आहे. महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण २०२५ ला मान्यता देण्यात आली आहे.
advertisement
1/6

वाढते इंधनाचे दर आणि प्रदूषणामुळे ईलेक्ट्रिक वाहनांना खास पसंती दिली जात आहे. जास्त रेंज आणि जलद बॅटरी रिचार्ज पर्याय उपलब्ध झाल्यामुळे आता इलेक्ट्रिक वाहनं खरेदीकडे लोकांचा कल वाढला आहे. अशातच आता महायुती सरकारने आता नवं इलेक्ट्रिक धोरण जाहीर केलं आहे. यामध्ये १०० टक्के लोन सुविधा दिली जाणार आहे. एवढंच नाहीतर राज्यात ईलेक्ट्रिक वाहनांना काही ठिकाणी टोल माफ असणार आहे.
advertisement
2/6
महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. मागील अनेक दिवसांपासून राज्यामध्ये इलेक्ट्रिक वाहन धोरण अंमलात आणणार अशी चर्चा होती. अखेरीस राज्य सरकारने महायुती सरकारला मंजुरी दिली आहे. महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण २०२५ ला मान्यता देण्यात आली आहे.
advertisement
3/6
महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरणानुसार आता राज्यामध्ये कोणतीही ईव्ही गााडी खरेदी करत असताना १० टक्के सूट मिळणार आहे. राज्य सरकारने या नवीन धोरणामध्ये तशी तरतूद केली आहे.
advertisement
4/6
जर तुम्हाला कोणतीही ईलेक्ट्रिक वाहन खरेदी करायचे असेल तर त्यावर १०० टक्के लोन सुविधा उपलब्ध असणार आहे. त्यामुळे आता कोणतीही ईलेक्ट्रिक वाहन खरेदी करताना फक्त डाऊन पेमेंट भरून तुम्ही ईलेक्ट्रिक वाहन घरी आणू शकतात.
advertisement
5/6
विशेष म्हणजे, जर तुमच्या इलेक्ट्रिक वाहन असेल तर राज्यात तुम्हाला टोल द्यावा लागणार नाही. महाराष्ट्र वाहन धोरणानुसार ईलेक्ट्रिक वाहनावर पुर्णता: टोल मुक्तता असणार आहे. पण यासाठी अटही घालण्यात आली आहे. काही रस्त्यावर संपूर्णपणे टोल माफ असणार आहे. त्यामुळे ईलेक्ट्रिक वाहन असेल तर तुम्हाला राज्यातील काही रस्त्यांवर एक रुपया सुद्धा टोल द्यायची गरज नाही.
advertisement
6/6
दरम्यान, परीवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी महाराष्ट्र ईलेक्ट्रिक वाहन धोरणावर आपली भूमिका स्पष्ट केली. ईलेक्ट्रिक वाहन घेतल्याने तुमचा फायदा होईल. महायुती सरकार शंभर टक्के इलेक्ट्रिक वाहन धोरण राबवणार आहे. राज्याचे आर्थिक नुकसान झाले तरी चालले पण राज्यात ईव्ही धोरण राबवणार असल्याचं सरनाईक यांनी स्पष्ट केलं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
EV Policy Maharashtra: खूशखबर, महाराष्ट्रात ईलेक्ट्रिक वाहनांना टोल माफ, 100 टक्के मिळणार लोन!