बुलेट आता विसरा, अमेरिकेची फेमस Harley Davidson ची आली दणकट बाईक, किंमतही जाहीर
- Published by:Sachin S
Last Updated:
अमेरिकेची लोकप्रिय अशी Harley-Davidson चा दर्जा तर काही वेगळाच आहे. तरुणांची ओळख लक्षात घेऊन Harley-Davidson ने भारतात आपली सगळ्यात स्वस्त अशी X440 T लाँच केली आहे.
advertisement
1/10

मागील काही वर्षांपासून भारतात दमदार आणि मजबूत अशी बाईक विकत घेण्याकडे तरुणाचं कल वाढत चालला आहे. बुलेटसारखी दमदार आणि वजनदार बाईक आपल्याकडे असावी, असं प्रत्येक तरुणाचं स्वप्न असतं. त्यातच अमेरिकेची लोकप्रिय अशी Harley-Davidson चा दर्जा तर काही वेगळाच आहे. तरुणांची ओळख लक्षात घेऊन Harley-Davidson ने भारतात आपली सगळ्यात स्वस्त अशी X440 T लाँच केली आहे.
advertisement
2/10
Harley-Davidson X440 T ने अलीकडे आपली 400cc ची बाइक भारतात लाँच केली आहे. या बाईकचा थेट सामना हा Royal Enfield Classic 350 शी असणार आहे. जीएसटीच्या दरात कपात झाल्यानंतर Harley-Davidson ने ही बाईक लाँच केली आहे. या बाइकमध्ये डिझाईन आणि नवीन फिचर्स दिले आाहे.
advertisement
3/10
Harley X440 T मध्ये 440cc इंजिन दिलं आहे जे 27 hp पाॉवर आणि 38 Nm टॉर्क जनरेट करतो. या बाइकमध्ये 6-स्पीड गियरबॉक्स दिला आहे. तर कमी RPM वर सुद्धा ही बाईक हायवेवर आरामदार आणि पॉवरफुल असा परफॉर्मन्स देते.
advertisement
4/10
तर दुसरीकडे Classic 350 मध्ये 349cc इंजिन आहे जे फक्त 20.2 hp पॉवर आणि 27 Nm टॉर्क जनरेट करतो. या बाइकमध्ये 5-स्पीड गिअरबॉक्स दिला आहे. यह शहरात ही बाइक आरामात चालवू शकतो. पण हायवेवर ही बाइक इतकी पॉवर फुल नाही.
advertisement
5/10
Harley X440 T मध्ये समोर 43mm USD फोर्क दिले आहे. हे फोर्क खरंतर स्पोर्ट्स बाईक्समध्ये पाहण्यास मिळतात. ज्यामुळे बाईक एकदम स्थिर राहते आणि ब्रेकिंग कंट्रोल उत्तमरित्या काम करतं. Harley X440 T मध्ये चाकं हे मोठ्या साईजची दिली आहे. त्यामुळे रस्त्यावर पकड ही मजबूत अशीच आहे.
advertisement
6/10
तर Classic 350 मध्ये 41mm टेलिस्कोपिक फोर्क दिले आहे, जे एक बेसिक सेटअप आहे. वजनामध्ये Classic 350 – 195 kg आहे तर Harley X440 T – 192 kg आहे. त्यामुळे दोन्ही बाईकची रस्त्यावर पकड ही मजबूत अशीच असणार आहे.
advertisement
7/10
Harley X440 T ची सुरुवाती किमत 2.79 लाख रुपये आहे, तर Classic 350 ची किंमत कमी आहे. दोन्ही बाईकच्या टॉप मॉडेलमध्ये Harley जवळपास 63,000 रुपयांनी महाग आहे. त्यामुळे Classic 350 ही बजेट फ्रेंडली आहे.
advertisement
8/10
पण Harley X440 T ही एक प्रीमियम बाईक आहे. पॉवर आणि परफॉर्मन्सच्या बाबतीत Harley X440 T बेस्ट ऑप्शन आहे. तर तिथेच Classic 350 ची कमी किंमत आणि कूल लुकमुळे विक्री जास्त आहे.
advertisement
9/10
Harley X440 T ही टेकनॉलाजीच्या बाबतीत Classic 350 पेक्षा खूप पुढे आहे. यामध्ये २ रायडिंग मोड, ट्रॅक्शन कंट्रोल आणि स्विचेबल ABS सारखे फिचर्स दिले आहेत. तर Classic 350 मध्येही चांगले फिचर्स आहे.
advertisement
10/10
पण Harley इतके अत्याधुनिक नााही. यामध्ये डुअल-चॅनल ABS आणि ट्रिपर नेव्हिगेशन आहे यामध्ये मिटर क्लस्टर रेट्रो स्टाइलचं सेमी-डिजिटल यूनिट आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
बुलेट आता विसरा, अमेरिकेची फेमस Harley Davidson ची आली दणकट बाईक, किंमतही जाहीर