IND vs SA : गंभीरला 4 खेळाडूंवर विश्वास नाही, पहिल्या T20 मधून हकालपट्टी... अशी असणार Playing XI!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या 5 टी-20 मॅचच्या सीरिजला मंगळवार 9 डिसेंबर पासून सुरूवात होणार आहे. शुभमन गिल आणि हार्दिक पांड्या यांचं दुखापतीनंतर टीम इंडियात कमबॅक झालं आहे.
advertisement
1/7

वनडे सीरिज जिंकल्यानंतर आता टीम इंडिया टी-20 सीरिजसाठी सज्ज झाली आहे. वनडे खेळलेले बहुतेक खेळाडू हे टी-20 सीरिजमध्ये दिसणार नाहीत, कारण भारताची टी-20 टीम ही पूर्णपणे वेगळी आहे. गिल आणि पांड्यासोबत बुमराहचंही विश्रांतीनंतर टीम इंडियात कमबॅक झालं आहे.
advertisement
2/7
गिल, पांड्या आणि बुमराह टीममध्ये परत आल्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठे बदल होण्याती शक्यता आहे. 15 खेळाडूंच्या या टीममध्ये 4 खेळाडूंना बाहेर बसावं लागू शकतं.
advertisement
3/7
शुभमन गिल टी-20 टीममध्ये आल्यापासून संजू सॅमसनला त्याच्या बॅटिंगचा नंबर बदलावा लागला. आशिया कपमध्ये संजू मिडल ऑर्डरमध्ये खेळला, पण या क्रमांकावर त्याला यश आलं नाही, त्यामुळे ऑस्ट्रेलियामधल्या टी-20 सीरिजमध्ये संजूला बाहेर करण्यात आलं. आता आफ्रिकेविरुद्धही संजूला बेंचवरच बसावं लागू शकतं.
advertisement
4/7
मागच्या काही काळापासून वॉशिंग्टन सुंदर हा भारताचा तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळणारा खेळाडू बनला आहे, पण दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट आणि वनडे सीरिजमध्ये सुंदरची कामगिरी निराशाजनक झाली, त्यामुळे पहिल्या टी-20 मध्ये सुंदरला चान्स मिळण्याची शक्यता कमी आहे.
advertisement
5/7
हार्दिक पांड्याचं भारतीय टीममध्ये कमबॅक झाल्यामुळे शिवम दुबेची जागाही धोक्यात आली आहे. आशिया कपची फायनल आणि ऑस्ट्रेलियामधल्या टी-20 सीरिजमध्ये दुबेने बॅटिंगसोबतच बॉलिंग करून हार्दिक पांड्याची कमी जाणवू दिली नाही, पण आता हार्दिक टीममध्ये आल्यामुळे दुबेच्या स्थानावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.
advertisement
6/7
हर्षित राणाला मागच्या काही काळापासून मिळत असलेल्या संधीमुळे कोच गौतम गंभीर अनेकदा टार्गेटवर आला आहे, पण पहिल्या टी-20 सामन्यात हर्षित राणाला बेंचवर बसवलं जाण्याची शक्यता आहे. कारण सुंदर, दुबे आणि हर्षित राणा यांच्यापैकी एकालाच प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा मिळू शकते.
advertisement
7/7
भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन : अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, जितेश शर्मा/संजू सॅमसन, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, हर्षित राणा/वॉशिंग्टन सुंदर/शिवम दुबे, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs SA : गंभीरला 4 खेळाडूंवर विश्वास नाही, पहिल्या T20 मधून हकालपट्टी... अशी असणार Playing XI!