TRENDING:

Vaibhav Suryavanshi : शतक ठोकल्यानंतर वैभव सूर्यवंशी टीममधून गायब, अचानक कुठे गेला? खरं समोर आलं!

Last Updated:
14 वर्षांचा युवा ओपनिंग बॅटर वैभव सूर्यवंशी अचानक सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी खेळत असताना गायब झाला. स्पर्धा सुरू असतानाच वैभव सूर्यवंशी नेमका कुठे गेला? असा प्रश्न निर्माण झाला.
advertisement
1/6
शतक ठोकल्यानंतर वैभव सूर्यवंशी टीममधून गायब, अचानक कुठे गेला? खरं समोर आलं!
उत्तर प्रदेशविरुद्धच्या सामन्यात वैभव सूर्यवंशी प्लेइंग इलेव्हनमध्ये दिसला नाही, त्यामुळे चाहत्यांच्या मनात वैभव टीममध्ये का नाही? असे प्रश्न उपस्थित झाले. वैभव सूर्यवंशी बिहारच्या टीमचा उपकर्णधारही आहे, तसंच त्याने महाराष्ट्राविरुद्ध नाबाद 108 रनची खेळीही केली होती.
advertisement
2/6
वैभव सूर्यवंशीची सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमधली कामगिरी साधारण राहिली. स्पर्धेच्या 6 सामन्यांमध्ये वैभव मैदानात उतरला, ज्यात त्याने 197 रन केले. स्पर्धेच्या फक्त एकाच सामन्यात महाराष्ट्राविरुद्ध वैभवने शतक ठोकलं, पण उरलेल्या सामन्यांमध्ये त्याची बॅट शांतच राहिली.
advertisement
3/6
वैभव सूर्यवंशी अचानक कुठे गायब झाला? खराब फॉर्म की फिटनेसच्या समस्येमुळे वैभव सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत खेळत नाहीये? असे अनेक प्रश्न भारतीय क्रिकेट चाहते विचारायला लागले. पण आता वैभव नेमका कुठे आहे, याबाबतची माहिती समोर आली आहे.
advertisement
4/6
वैभव सूर्यवंशीला बिहार टीमने रिलीज केलं आहे. वैभव आता भारताच्या अंडर-19 टीमकडून खेळणार आहे. आयुष म्हात्रेच्या नेतृत्वात वैभव आशिया कप खेळेल. आशिया कपमध्ये भारताचा पहिला सामना युएईविरुद्ध 12 डिसेंबरला होणार आहे.
advertisement
5/6
आशिया कपमध्ये भारताचा दुसरा सामना पाकिस्तानविरुद्ध 14 डिसेंबरला तर तिसरा सामना 16 डिसेंबरला मलेशियाविरुद्ध होईल. 3 सामन्यांनंतर नॉकआऊट राऊंडला सुरूवात होईल.
advertisement
6/6
वैभव सूर्यवंशीला आयपीएल 2026 आधी राजस्थान रॉयल्सने रिटेन केलं आहे, त्यामुळे आयपीएलच्या या मोसमातही वैभव राजस्थानकडून खेळताना दिसेल. आयपीएलच्या मागच्या मोसमात वैभव सूर्यवंशीने शतक ठोकून इतिहास घडवला होता. टी-20 मध्ये सगळ्यात कमी वयात शतक ठोकण्याचा विक्रम वैभवने केला होता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Vaibhav Suryavanshi : शतक ठोकल्यानंतर वैभव सूर्यवंशी टीममधून गायब, अचानक कुठे गेला? खरं समोर आलं!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल