Audi ते Porsche! क्रिकेटचा किंग Car Collectionचा बादशहा, Virat Kohliच्या गॅरेजमध्ये कोटींच्या गाड्या
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Virat Kohali Car Collection : विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.मैदानावर जितका आक्रमक आणि फोकस्ड असलेला विराट मैदानाबाहेरही तितकाच स्टायलिश आणि रॉयल आहे. त्याच्या कार कलेक्शनवर एक नजर टाकूया.
advertisement
1/7

गेल्या काही दिवसांपासून जी शक्यता वर्तवली जात होती ती खरी ठरली. भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.
advertisement
2/7
मंगळवारी सकाळी त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट करत चाहत्यांना ही माहिती दिली. त्याच्या या घोषणेमुळे लाखो चाहते भावनिक झाले आहेत. रोहित शर्माने आधीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यामुळे भारतीय संघासाठी ही दुहेरी धक्का मानला जात आहे.
advertisement
3/7
"14 वर्षांपूर्वी मी बॅगी ब्लू परिधान करून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. हा प्रवास मला खूप काही शिकवून गेला. त्याने माझी परीक्षा घेतली, मला आकार दिला आणि अमूल्य धडे दिले", अशी भावनिक पोस्ट शेअर करत विराटने ही घोषणा केली.
advertisement
4/7
या घोषणेनंतर सोशल मीडियावर कोहलीच्या कारकीर्दीबद्दल भरभरून चर्चा सुरू झाली आहे. पण त्याचबरोबर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे ती म्हणजे विराट कोहलीची आलिशान गाड्यांची. मैदानावर जितका आक्रमक आणि फोकस्ड असलेला विराट मैदानाबाहेरही तितकाच स्टायलिश आणि रॉयल आहे.
advertisement
5/7
विराट कोहलीकडे असलेल्या कार्सच्या किमती ऐकून कोणीही थक्क होईल. त्याच्या गॅरेजमध्ये असलेली Lamborghini Huracan सुमारे 3.22 कोटींची आहे. Porsche 911 ची किंमत 3.51 कोटी आहे.
advertisement
6/7
तर Bentley Continental GT 4.04 कोटी आणि Bentley Flying Spur 3.80 कोटींच्या घरात आहे. याशिवाय Audi R8 V10 आणि R8 LMX सारख्या स्पोर्ट्स कार्सही त्याच्या कलेक्शनचा भाग आहेत.
advertisement
7/7
कोहलीने यापूर्वी एका मुलाखतीत सांगितलं होतं की गाड्यांवर त्याचं विशेष प्रेम आहे आणि मेहनतीच्या जोरावर तो स्वतःसाठी अशा गाड्या घेऊ शकतो ही गोष्ट त्याला अभिमानाची वाटते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
Audi ते Porsche! क्रिकेटचा किंग Car Collectionचा बादशहा, Virat Kohliच्या गॅरेजमध्ये कोटींच्या गाड्या