MPSC Exam : 7 वर्षात 23 वेळा अपयश! अखेर 24व्या प्रयत्नात तरुणाने मिळवली सरकारी नोकरी
- Published by:Rahul Punde
Last Updated:
MPSC Exam : नांदेडमधील तरुणाने तब्बल 23 वेळा अपयश पचवत यशाला गवसणी घातली आहे. (मुजीब शेख, प्रतिनिधी)
advertisement
1/6

सरकरी नोकरी मिळवण्यासाठी विद्यार्थी जीवतोड मेहनत घेतात. अनेकदा त्यांना अपयश येतं. काही अपयशाने खचून जातात. तर काही प्रत्यत्न सोडत नाही. नांदेडमधील एका तरुणाची याच मूर्तीमंत उदाहरण आहे.
advertisement
2/6
नांदेड जिल्ह्यातील हदगांव तालुक्यातील माटाळा गावातील सागर शिंदे या तरुणाची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.
advertisement
3/6
कारण एमपीएससीच्या परीक्षेत तब्बल 23 वेळा अपयश आले तरी या बहाद्दराने प्रयत्न करणे काही सोडले नाही.
advertisement
4/6
घरची आर्थिक परिस्थिती बिकट असतानाही सागरने सात वर्षे संघर्षमय स्थितीत अभ्यास केला. आणि 24 व्या प्रयत्नात त्याने मंत्रालयातील लिपिक आणि कर सहहायक अधिकारी अश्या दोन्ही नोकरीसाठी तो पात्र ठरला.
advertisement
5/6
दोन चार वेळा अपयश आल्यानंतर टोकाचे निर्णय घेणाऱ्या युवकांनी सागरच्या यशापासून धडा घ्यावा अशीच ही कहाणी आहे.
advertisement
6/6
सागरच्या या यशानंतर गावकऱ्यांनी त्याचे मोठ्या थाटात स्वागत करत त्याच्या यशाचा आनंदोत्सव साजरा केला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/करिअर/
MPSC Exam : 7 वर्षात 23 वेळा अपयश! अखेर 24व्या प्रयत्नात तरुणाने मिळवली सरकारी नोकरी