मालिकेतील भाऊ-बहिण, खऱ्या आयुष्यात झाले नवरा-बायको; सूरज चव्हाणनंतर प्रसिद्ध मराठी अभिनेता विवाहबंधनात
- Published by:Minal Gurav
Last Updated:
ऑनस्क्रिन भाऊ-बहिणीची भुमिका साकारणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्या आणि अभिनेत्याची जोडी खऱ्या आयुष्यात एकमेकांचे नवरा - बायको झाले आहेत. दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
advertisement
1/7

अभिनय क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक कलाकारांच्या गाठी कधी सेटवर, कधी कॅमेरासमोर तर कधी कॅमेराच्या मागे जुळतात. अनेक कलाकार आहेत ज्यांनी ऑनस्क्रिन कधी आईची, कधी बहिणीची तर कधी मैत्रिणीची भूमिका केलेली असते. पण खऱ्या आयुष्यात मात्र हे कलाकार एकमेकांचे नवरा बायको होतात.
advertisement
2/7
असंच काहीस घडलं आहे एका प्रसिद्ध अभिनेत्याबरोबर आणि अभिनेत्रीबरोबर. मालिकेत भाऊ आणि बहिणीची भूमिका साकारणारे हे दोघे खऱ्या आयुष्यात आता एकमेकांचे नवरा बायको झाले आहेत.
advertisement
3/7
बिग बॉस मराठी 5 चा विजेता सूरज चव्हाणने नुकतंच लग्न केलं. सूरज नंतर प्रसिद्ध मराठी अभिनेता स्वानंद केतकर आणि अभिनेत्री अक्षता आपटे यांनीही लग्न केलं. दोघांच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
advertisement
4/7
स्वानंद आणि अक्षता यांनी '36 गुणी जोडी' मालिकेत एकत्र काम केलं होतं. मालिकेत त्यांनी भाऊ बहिणीची भूमिका साकारली होती. ऑनस्क्रिन भाऊ बहिण आता ऑफस्क्रिन नवरा-बायको झाले आहेत.
advertisement
5/7
स्वानंदची बायको अक्षता ही देखील अभिनेत्री आहे. 'नवरी मिळे हिटलरला' या मालिकेत ती महत्त्वाच्या भुमिकेत होती. अभिनयाबरोबरच ती उत्तम कवयित्री आहे.
advertisement
6/7
तर स्वानंद 'तू तेव्हा तशी' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यात त्याने रूमानी खरेच्या बॉयफ्रेंडचा रोल केला होता. या मालिकेतील त्याची भुमिकाही प्रेक्षकांना आवडली होती.
advertisement
7/7
अक्षता आणि स्वानंद गेली अनेक वर्ष रिलेशनमध्ये आहेत. 2023 मध्ये दोघांनी साखरपुडा केला होता. साखरपुड्याच्या दोन वर्षांनी दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
मालिकेतील भाऊ-बहिण, खऱ्या आयुष्यात झाले नवरा-बायको; सूरज चव्हाणनंतर प्रसिद्ध मराठी अभिनेता विवाहबंधनात