आवडला का माझा महाराष्ट्रीय लुक? आलियानं शेअर केली पोस्ट, चौथा फोटो अजिबात मिस करू नका
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Alia Bhatt Maharashtrian Look : नेहमीच स्टायलिश अंदाज आणि वेगळ्या फॅशनमध्ये रमणारी आलिया भट्ट पहिल्यांदा महाराष्ट्रीयन लुकमध्ये दिसली आहे. आलियानं मराठमोळी नऊवारी साडी नेसून सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.
advertisement
1/7

मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये सुरू झालेल्या 'वेव्हज समिट 2025' या चार दिवसांच्या कार्यक्रमात बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने खास हजेरी लावली.
advertisement
2/7
या कार्यक्रमात देश-विदेशातील सेलिब्रिटी सहभागी झाले असून, विविध विषयांवर चर्चा सत्रे घेतली जात आहेत.
advertisement
3/7
या इव्हेंटच्या पहिल्याच दिवशी आलिया भट्टने आपल्या इंस्टाग्रामवर एक फोटो सीरिज शेअर केली. त्यामध्ये ती पारंपरिक महाराष्ट्रीयन वेशात हजेरी लावली.
advertisement
4/7
आलियानं गुलाबी आणि नारंगी रंगाची नऊवारी साडी नेसली होती. केसांचा अंबाडा आणि हिरव्या रंगाचे कानातले तिच्या लूकवर उठून दिसत होते.
advertisement
5/7
आलियाला गजरा माळण्याचा मोह देखील आवरला नाही. तिने गजर देखील हातात घेत फोटो पोझेस दिल्यात.
advertisement
6/7
फोटोसह आलियाने लिहिले, "Waving at you from #WAVES." तिचा हा स्टायलिश आणि पारंपरिक अंदाज,नॅशरल स्माइलनं चाहत्यांची मनं जिंकली आहेत.
advertisement
7/7
'वेव्हज समिट 2025' हे वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंटवर आधारित एक मोठं व्यासपीठ आहे. अशा मोठ्या कार्यक्रमात आलियाचा ट्रेडिशनल अंदाज, सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
आवडला का माझा महाराष्ट्रीय लुक? आलियानं शेअर केली पोस्ट, चौथा फोटो अजिबात मिस करू नका