TRENDING:

Disney च्या सिनेमात राणी होणार आलिया भट्ट? आगामी प्रोजेक्टविषयी मोठी माहिती समोर

Last Updated:
बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट हिने बॅक टू बॅक हिट चित्रपट देऊन इंडस्ट्रीत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. आलिया भट्टने केवळ बॉलिवूडच नाही तर हॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. आता त्यानंतर आलिया भट्ट लवकरच डिस्नेच्या आगामी चित्रपटात राणीच्या भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. काय आहे त्यामागचं सत्य जाणून घ्या.
advertisement
1/8
Disney च्या सिनेमात राणी होणार आलिया भट्ट? आगामी प्रोजेक्टविषयी मोठी माहिती समोर
आलिया भट्टने 2023 मध्ये आलिया भट्टने गॅल गॅडोटच्या 'हार्ट ऑफ स्टोन' या चित्रपटाद्वारे हॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
advertisement
2/8
आता प्रसिद्ध दिग्दर्शक गुरिंदर चढ्ढा यांच्या आगामी डिस्नेच्या चित्रपटात आलिया दिसणार असल्याची चर्चा होती.
advertisement
3/8
या चित्रपटात आलिया भट्ट भारतीय प्रिन्सेस म्हणजेच राजकुमाराच्या भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा आहे. आता त्यावर चित्रपटाच्या निर्मात्यांनी अखेर मौन सोडलं आहे.
advertisement
4/8
दिग्दर्शक गुरिंदर चढ्ढा यांनी या चर्चा फक्त अफवा असल्याचं म्हणत ही माहिती फेटाळून लावली आहे. तसंच सध्या चित्रपटाच्या स्क्रिप्टिंगवर काम सुरू असल्याचीही माहिती त्यांनी दिली आहे.
advertisement
5/8
दिग्दर्शक गुरिंदर चढ्ढा यांनी अलीकडेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर आलिया भट्ट डिस्नेच्या 'इंडियन प्रिन्सेस' प्रोजेक्टमध्ये सामील झाल्याच्या बातम्या चुकीच्या असल्याचं सांगितलं आहे. गुरिंदर चढ्ढा यांनी X वर लिहिलं- 'हे खरं नाही. ही माहिती कोणी दिली माहिती नाही, पण अजून स्क्रिप्टवर काम सुरू आहे.'
advertisement
6/8
त्या पुढे म्हणाल्या, 'आलिया आणि मी दुसऱ्या काही प्रोजेक्टसाठी भेटलो होतो आणि मी अलीकडेच तिच्या चॅरिटी इव्हेंटमध्येही सहभागी झाले होते.' असं म्हणत त्यांनी आलिया भट्टच्या या चित्रपटाविषयी समोर आलेली माहिती खरी नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
advertisement
7/8
दिग्दर्शक गुरिंदर चढ्ढा यांच्या या पोस्टनंतर आलिया भट्टच्या चाहत्यांची निराशा झाली आहे.
advertisement
8/8
आलिया भट्टच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर, 'गंगूबाई काठियावाडी', 'डॉरलिंग', 'ब्रह्मास्त्र', 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'.' सारखे अनेक बॅक टू बॅक सिनेमे दिल्यानंतर आलिया लवकरच पती रणबीर कपूर आणि विकी कौशलसोबत 'लव्ह अँड वॉर' चित्रपटात स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. तसंच ती 'जिगरा' चित्रपटात देखील झळकणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Disney च्या सिनेमात राणी होणार आलिया भट्ट? आगामी प्रोजेक्टविषयी मोठी माहिती समोर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल