TRENDING:

ऑल टाईम Blockbuster..! 50 दिवस थिएटरमधून हलला नाही सिनेमा, कमाईत रचला इतिहास

Last Updated:
All time blockbuster cimena: बॉक्स ऑफिसवर अनेक सिनेमे जोरात आपटतात तर काही सिनेमे घर करुन बसतात. काही सिनेमांची थिएटर ओसाड पडतात तोच काही सिनेमे 50 दिवसांपेक्षाही अधिक दिवस थिएटरवर राज्य करतात.
advertisement
1/7
ऑल टाईम Blockbuster..! 50 दिवस थिएटरमधून हलला नाही सिनेमा, कमाईत रचला इतिहास
बॉक्स ऑफिसवर अनेक सिनेमे जोरात आपटतात तर काही सिनेमे घर करुन बसतात. काही सिनेमांची थिएटर ओसाड पडतात तोच काही सिनेमे 50 दिवसांपेक्षाही अधिक दिवस थिएटरवर राज्य करतात. अशाच एका सिनेमाविषयी जाणून घेऊया जो 2024 मधला ऑल टाईम ब्लॉकबस्टर आहे.
advertisement
2/7
हा सिनेमा दुसरा तिसरा कोणता नसून सुपरस्टार अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2: द रुल' आहे. हा 2024 मधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. हा चित्रपट गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात प्रदर्शित झाला असला तरी 2025 मध्येही त्याच्या कमाईचा वेग थांबण्याचं नावं घेत नाहीत.
advertisement
3/7
'पुष्पा 2: द रुल' हा ॲक्शन सिनेमा प्रदर्शित होऊन दीड महिने उलटली. बॉक्स ऑफिसवर अजूनही सिनेमा कलेक्शन करत आहे. गेल्या 50 दिवसांत 'पुष्पा 2: द रुल' ने देशभरात मोठा व्यवसाय केला आहे. पहिल्या दिवसापासूनच या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कब्जा केला होता. 'पुष्पा 2: द रुल'ने पहिल्या दिवशी जगभरात 294 कोटींची कमाई करून इतिहास रचला आहे. पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा हा भारतीय चित्रपट ठरला.
advertisement
4/7
या चित्रपटाने पहिल्या चार दिवसांत तिहेरी अंकांची कमाई केली. या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात देशभरात 725.8 कोटींचा व्यवसाय केला. 'पुष्पा 2: द रुल'ने चौथ्या आठवड्यात 69.65 कोटी रुपये, पाचव्या आठवड्यात 25.25 कोटी रुपये कमवले. सहाव्या आठवड्यात चित्रपटाच्या कमाईत घसरण झाली आहे.
advertisement
5/7
या चित्रपटाने 7 व्या गुरुवारी म्हणजेच 50 व्या दिवशी देशभरात 50 लाख रुपयांचा व्यवसाय केला आहे. चित्रपटाची एकूण कमाई 1230.55 कोटी रुपये झाली आहे.
advertisement
6/7
अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2: द रुल' हा तेलगू भाषेत बनला असला तरी त्याने हिंदी भाषेत सर्वाधिक 809.64 कोटींची कमाई केली आहे. अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2: द रुल' हा दुसरा सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट आहे. पहिल्या क्रमांकावर आमिर खानचा 'दंगल' हा चित्रपट 2000 कोटींची कमाई करणारा आहे.
advertisement
7/7
'पुष्पा 2: द रुल' हा 2024 मधील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक होता. याचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले असून कथाही त्यांनीच लिहिली आहे. 'पुष्पा 2: द रुल'मध्ये अल्लू अर्जुन शिवाय फहाद फाजिल, रश्मिका मंदान्ना, जगपती बाबू, सुनील आणि राव रमेश सारखे स्टार्स महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
ऑल टाईम Blockbuster..! 50 दिवस थिएटरमधून हलला नाही सिनेमा, कमाईत रचला इतिहास
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल