अभिनेत्रींपेक्षा आहे सुंदर, बॉलिवूड नाही तर या क्षेत्रात करते काम, 'मोगॅम्बो'च्या मुलीला पाहिलंत का?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Amrish Puri Daughter : अभिनेत्री अमरीश पुरी यांना एक मुलगी आहे. अभिनय क्षेत्रात नाही तर वेगळ्या क्षेत्रात ती कार्यरत आहे.
advertisement
1/7

'मोगॅम्बो खुश हुआ' हा डायलॉग जेव्हाही ऐकायला मिळतो तेव्हा डोळ्यांसमोर एक नाव येतं ते म्हणजे अभिनेत अमरीश पुरी यांचं. हिंदी सिनेसृष्टीतील खलनायकांची नाव घेतली जातात तेव्हा त्यात अमरीश पुरी हे नाव अग्रस्थानी येतं.
advertisement
2/7
बॉलिवूडवर तब्बल 3 दशकं राज्य करणारे अमरीश पुरी यांच्या निधनानंतर त्यांची पुढची पिढी अभिनय क्षेत्रात आली नाही. त्यांना एक मुलगी आहे. ती अभियन क्षेत्रात नसली तरी दिसायला मात्र ग्लॅमरस आहे. सौंदर्याच्या बाबतील अभिनेत्रींना टक्कर देते.
advertisement
3/7
नम्रता पुरी असं अमरीश पुरी यांच्या मुलीचं नाव आहे. 20 ऑगस्ट 1983 रोजी तिचा मुंबईमध्ये जन्म झाला. ती आता 41 वर्षांची आहे. सौंदर्य आणि फिटनेसवर ती विशेष लक्ष देताना दिसते. तिच्याकडे पाहिल्यावर याचा अंदाज येतो.
advertisement
4/7
नम्रताने सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगमध्ये शिक्षण घेतलं आहे. पण तिनं करिअर फॅशन डिझायनिंगमध्ये केलं आहे.
advertisement
5/7
नम्रता पुरी ही फॅशन शोमध्ये डिझाईन केलेले कपडे तयार करते. बॉलिवूडपासून दूर राहूनही ती इंस्टाग्रामवर खूप अ‍ॅक्टिव्ह आहे.तिला सोशल मीडियावर 12,000 हून अधिक लोक फॉलो करतात.
advertisement
6/7
नम्रता पुरीच्या इंस्टाग्रामवरील फोटो तिच्या ग्लॅमरस स्टाईल आणि स्टायलिश आहेत. तिच्या लुक्सचं आणि ड्रेसिंग सेन्सचं नेहमीच कौतुक होतं. नम्रता जर बॉलिवूडमध्ये आली असती तर नक्कीच तिच्या स्टाईलने सर्वांचं लक्ष वेधलं असतं.
advertisement
7/7
अमरीश पुरी यांनी उर्मिला दिवेकर यांच्याशी लग्न केलं. दोगांना राजीव पुरी आणि नम्रता पुरी अशी दोन मुलं आहेत. नम्रताने शिरीष बागवे यांच्याशी लग्न केलं आहे. ती तिच्या पतीबरोबर सुखी आयुष्य जगतेय.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
अभिनेत्रींपेक्षा आहे सुंदर, बॉलिवूड नाही तर या क्षेत्रात करते काम, 'मोगॅम्बो'च्या मुलीला पाहिलंत का?