TRENDING:

Bigg Boss संपलं आता पुढे काय? OTT वर येताएत पॉवरपॅक रिॲलिटी शोज्, मिळणार भरपूर ड्रामा, सस्पेन्स अन् ॲक्शन

Last Updated:
Upcoming Reality Shows after Bigg Boss 19: 'बिग बॉस'च्या जागी आता एकापेक्षा एक सरस ६ नवीन रिॲलिटी शोची धमाकेदार लाईन-अप तयार आहे, ज्यात ॲक्शन आणि मस्तीचा पुरेपूर मसाला आहे!
advertisement
1/8
भरपूर ड्रामा, सस्पेन्स अन् ॲक्शन; Bigg Boss नंतर OTTवर येताएत पॉवरपॅक रिॲलिटी शो
मुंबई: 106 दिवसांच्या नॉनस्टॉप ड्रामानंतर अखेर 7 डिसेंबर रोजी बिग बॉस 19 ची सांगता झाली आणि गौरव खन्नाने विजेतेपद आपले नाव कोरले. मात्र, आता गेले तीन महिने सलग हा शो पाहणाऱ्या प्रेक्षकांनी आता नवे शो शोधायला सुरुवात केली आहे.
advertisement
2/8
पण तुमची ही प्रतीक्षा संपली आहे! 'बिग बॉस'च्या जागी आता एकापेक्षा एक सरस ६ नवीन रिॲलिटी शोची धमाकेदार लाईन-अप तयार आहे, ज्यात ॲक्शन आणि मस्तीचा पुरेपूर मसाला आहे!
advertisement
3/8
MTV Splitsvilla 16: करण कुंद्रा आणि सनी लिओनीचा हा शो पुन्हा एकदा 'लव्ह, धोका आणि चॅलेंजच्या' हाय-स्टेक स्पर्धेसाठी सज्ज झाला आहे. या सिझनमध्ये उर्फी जावेद आणि निया शर्मा 'मिसचीफ मेकर्स' म्हणून नवा ड्रामा घेऊन येणार आहेत! ९ जानेवारी २०२६ पासून तुम्ही हा शो JioHotstar वर पाहू शकता.
advertisement
4/8
Khatron Ke Khiladi S15: रोहित शेट्टीचा स्टंट-बेस्ड शो 'खतरों के खिलाडी' परत येत आहे. यात सेलिब्रिटी स्पर्धक आपल्या भीतीचा सामना करत, थरारक स्टंट्स करून शो जिंकण्यासाठी संघर्ष करतील. हा शो जानेवारी २०२६ मध्ये JioHotstar वर रिलीज होण्याची शक्यता आहे.
advertisement
5/8
Shark Tank India S5: उद्योजकांना प्रेरणा देणारा बिझनेस रिॲलिटी शो 'शार्क टँक इंडिया' परत येत आहे. नवोदित उद्योजक त्यांचे बिझनेस आयडिया शार्क्ससमोर मांडतील आणि त्यांच्या स्टार्ट-अपसाठी निधी आणि मार्गदर्शन मिळवण्याचा प्रयत्न करतील. जानेवारी २०२६ मध्ये SonyLiv वर हा शो रिलीज होण्याची शक्यता आहे.
advertisement
6/8
The Great Indian Kapil Show S4: लोकप्रिय कॉमेडियन कपिल शर्मा त्याच्या शोचा नवा सीझन घेऊन येत आहे. यात तो सेलिब्रिटींशी संवाद साधेल, प्रेक्षकांशी गप्पा मारेल आणि कुटुंबासोबत पाहता येणारी फॅमिली कॉमेडी करेल. २० डिसेंबर २०२५ पासून Netflix वर तुम्ही हा शो पाहू शकता.
advertisement
7/8
The 50: 'बिग बॉस १९' च्या अंतिम सोहळ्यात सलमान खानने या नव्या रिॲलिटी शोची घोषणा करून सस्पेन्स निर्माण केला आहे. याबद्दल अधिक माहिती गुलदस्त्यात असली तरी, हा शो प्रेक्षकांसाठी हाय-स्टेक एंटरटेनमेंट घेऊन येणार यात शंका नाही. प्रदर्शनाची तारीख लवकरच सांगण्यात येणार असून हा शो JioHotstar वर रिलीज होईल.
advertisement
8/8
Laughter Chefs S3: भारती सिंग होस्ट करत असलेला आणि शेफ हरपाल सिंग सोखी जज असलेला हा शो २२ नोव्हेंबरपासून सुरू झाला आहे. करण कुंद्रा, तेजस्वी प्रकाश, एलविश यादव आणि कृष्णा अभिषेक या सेलिब्रिटी जोड्या स्वयंपाकघरातील गोंधळ आणि कॉमेडीचा डोस प्रेक्षकांना देत आहेत. तुम्ही हा शो JioHotstar वर पाहू शकता. 'बिग बॉस' संपला असला तरी, मनोरंजनाचा हा नवा साठा प्रेक्षकांना स्क्रीनला खिळवून ठेवणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Bigg Boss संपलं आता पुढे काय? OTT वर येताएत पॉवरपॅक रिॲलिटी शोज्, मिळणार भरपूर ड्रामा, सस्पेन्स अन् ॲक्शन
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल