Sachin Tendulkar-Shilpa Shirodkar : सचिन तेंडुलकरसोबत खरंच अफेअर होतं का? अखेर शिल्पा शिरोडकरने मनातलं सांगितलंच
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Sachin Tendulkar-Shilpa Shirodkar : अंजली तेंडुलकरसोबत लग्न करण्यापूर्वी सचिन एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या प्रेमात आकंठ बुडाला होता, अशा चर्चांनी तेव्हा एकच खळबळ उडवली होती! ही अभिनेत्री दुसरी कुणी नसून, सुपरस्टार महेश बाबूची मेहुणी आणि बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शिरोडकर होती!
advertisement
1/8

मुंबई: क्रिकेटच्या जगतात देव अशी ओळख असलेला आणि करोडो लोकांच्या हृदयावर राज्य करणारा 'मास्टर ब्लास्टर' सचिन तेंडुलकर त्याच्या खेळासोबतच, त्याच्या खासगी आयुष्यामुळेही नेहमीच चर्चेत असतो. पण ९० च्या दशकात एक अशी बातमी पसरली होती, जिने सचिनच्या फॅन्सनाही चकित केलं.
advertisement
2/8
अंजली तेंडुलकरसोबत लग्न करण्यापूर्वी सचिन एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या प्रेमात आकंठ बुडाला होता, अशा चर्चांनी तेव्हा एकच खळबळ उडवली होती! ही अभिनेत्री दुसरी कुणी नसून, सुपरस्टार महेश बाबूची मेहुणी आणि बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शिरोडकर होती! सचिन आणि शिल्पा दोघेही मराठी असल्याने, आणि काही कार्यक्रमांमध्ये ते एकत्र दिसल्याने, त्यांच्यात स्पेशल बॉन्डिंग असल्याची कुजबुज तेव्हा सुरू झाली होती. ही अफवा इतकी पसरली की, आजही ती अनेकांच्या स्मरणात आहे.
advertisement
3/8
मात्र, या सगळ्या अफेअरच्या चर्चांवर अभिनेत्री शिल्पा शिरोडकरने नुकत्याच एका मुलाखतीत स्पष्टीकरण दिलं आहे. ती म्हणाली, "१९९१ मध्ये माझ्या 'हम' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान मी सचिनला पहिल्यांदा भेटले." शिल्पाने पुढे सांगितलं की, तिचा चुलत भाऊ जिथे राहायचा, त्याच परिसरात सचिनही राहत होता आणि ते दोघे एकत्र क्रिकेट खेळायचे. याच निमित्ताने सचिनशी तिची ओळख झाली.
advertisement
4/8
शिल्पाने पुढे केलेला खुलासा अधिक महत्त्वाचा आहे. ती म्हणाली, "मी जेव्हा सचिनला भेटले, तेव्हा तो त्याची होणारी पत्नी अंजलीच्या प्रेमात होता! पण त्यावेळी ही गोष्ट कुणालाही माहीत नव्हती." शिल्पाने या चर्चा का सुरू झाल्या याबाबतही सविस्तर सांगितलं. "मी एक अभिनेत्री होते आणि सचिन एक स्टार क्रिकेटर होता. त्यामुळे आम्ही एकदा एकत्र दिसताच, मीडियाने लगेच आमच्या प्रेमाच्या कथा रचायला सुरुवात केली. पण त्यावेळी सचिन अंजलीसोबतच रिलेशनशिपमध्ये होता."
advertisement
5/8
शिल्पा शिरोडकर ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री नम्रता शिरोडकरची सख्खी बहीण आहे, म्हणजेच ती सुपरस्टार महेश बाबूची मेहुणी लागते. ९० च्या दशकात शिल्पाने बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने वेगळी छाप पाडली होती. तिने 'ब्रह्मा' या चित्रपटातून तेलुगू प्रेक्षकांनाही भुरळ घातली होती. आपल्या करिअरच्या ऐन शिखरावर असतानाच तिने चित्रपटातून ब्रेक घेऊन खासगी आयुष्यावर लक्ष केंद्रित केलं.
advertisement
6/8
या अफवांवर सचिन तेंडुलकरनेही तीव्र प्रतिक्रिया दिली होती. एका मुलाखतीत त्याला 'तुम्ही तुमच्याबद्दल ऐकलेली सर्वात वाईट अफवा कोणती?' असं विचारलं असता, सचिनने लगेच उत्तर दिलं होतं, "मी आणि शिल्पा शिरोडकर रिलेशनशिपमध्ये आहोत, हीच ती अफवा." त्याने पुढे असंही स्पष्ट केलं की, शिल्पाला तो वैयक्तिकरित्या ओळखतही नाही. यानंतर या चर्चांना पूर्णविराम मिळाला.
advertisement
7/8
शिल्पा शिरोडकरची खरी लव्हस्टोरीही खूप रंजक आहे. २००० साली तिने यूकेमधील बँकर अपरेश रणजीत याच्याशी लग्न केलं. त्यांना अनौष्का नावाची एक गोंडस मुलगी आहे. शिल्पाने तर अपरेशला भेटल्यानंतर अवघ्या दीड दिवसातच लग्नासाठी हो म्हटलं होतं!
advertisement
8/8
तर, सचिन तेंडुलकरने २४ मे १९९५ रोजी अंजलीशी लग्न केलं. त्यांच्यात सहा वर्षांचं वयाचं अंतर असलं तरी, त्यांचं नातं आजही खूप मजबूत आहे. मुंबई विमानतळावर त्यांची पहिली भेट झाली आणि 'फर्स्ट साईट'मध्येच ते एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यांना सारा आणि अर्जुन तेंडुलकर ही दोन मुलं आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Sachin Tendulkar-Shilpa Shirodkar : सचिन तेंडुलकरसोबत खरंच अफेअर होतं का? अखेर शिल्पा शिरोडकरने मनातलं सांगितलंच