TRENDING:

'ती काम करणार की नाही ते माझा मुलगा ठरवेल!' गौहरच्या सासऱ्याचं बोलणं ऐकून चाहते खवळले, नेटकऱ्यांनी धु-धु धुतलं

Last Updated:
लोकप्रिय संगीतकार इस्माइल दरबार यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आपल्या सूनबाई गौहर खानच्या व्यावसायिक जीवनाबद्दल जे विधान केले आहे, त्यामुळे सोशल मीडियावर मोठा गदारोळ माजला आहे.
advertisement
1/9
गौहरच्या सासऱ्याचं बोलणं ऐकून चाहते खवळले, नेटकऱ्यांनी धु-धु धुतलं
मुंबई: लोकप्रिय संगीतकार इस्माइल दरबार यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आपल्या सूनबाई गौहर खानच्या व्यावसायिक जीवनाबद्दल जे विधान केले आहे, त्यामुळे सोशल मीडियावर मोठा गदारोळ माजला आहे.
advertisement
2/9
आपण जुन्या आणि मागासलेल्या विचारांचे असल्याचे सांगत इस्माइल दरबार यांनी थेट सांगितले की, लग्नानंतर गौहर खानने काम करणे त्यांना अजिबात पसंत नाही.
advertisement
3/9
जैद दरबारची पत्नी म्हणून दरबार घराण्यात आलेल्या गौहर खानबद्दल इस्माइल दरबार यांनी केलेली ही 'स्त्री-विरोधी' टिप्पणी लोकांना अजिबात आवडली नाही. यामुळे लोक फक्त इस्माइल दरबार यांनाच नाही, तर त्यांचे दोन्ही मुलगे जैद आणि आवेज दरबार यांनाही ट्रोल करत आहेत.
advertisement
4/9
गौहर खानच्या बाजूने उभे राहिलेल्या चाहत्यांनी इस्माइल दरबार यांच्या विधानांना सडेतोड उत्तर दिले आहे. एका संतप्त युजरने लिहिले, "मग आता तुमचे घर जैदच्या टिकटॉक व्हिडिओतून चालेल का?" तर दुसऱ्याने थेट प्रश्न केला, "गौहर जर काम करणार नसेल, तर तुमच्या घरात कोण कमवणार? कारण तुमच्या कुटुंबात तीच सर्वात प्रसिद्ध आहे."
advertisement
5/9
आणखी एका चाहत्याने आवेज दरबारवर निशाणा साधत विचारले, "आवेज दरबारच्या नाचण्यातून जो पैसा येतो, तो तुम्हाला चालतो का?" तर दुसऱ्याने संतापून म्हटले, "जैद, जो तिचा नवरा आहे, त्याला हे सांगण्याचा हक्क कोणी दिला की तिने काम करायचे की नाही? त्याने तिला वाढवले आहे का? नाही, मग कोणाकडेही हा अधिकार नाहीये!"
advertisement
6/9
फक्त गौहरच नाही, तर इस्माइल दरबार यांच्या दुसऱ्या मुलाची, आवेजची गर्लफ्रेंड नगमा मिराजकर, जी एक इन्फ्लुएंसर आहे, तीदेखील चर्चेत आली आहे. इस्माइल दरबार यांचे विचार पाहून अनेक चाहत्यांनी नगमाला लग्न न करताच पळून जाण्याचा सल्ला दिला आहे.
advertisement
7/9
एका युजरने थेट नगमाला उद्देशून लिहिले, "नगमा, तू जर हे वाचत असशील तर आत्ताच पळून जा, कारण आवेजला आधीच समस्या आहेत आणि त्याचे कुटुंबही असेच आहे."
advertisement
8/9
एका मुलाखतीत इस्माइल दरबार यांनी स्पष्ट केले होते की, ते मागासलेल्या विचारांचे आहेत. टीव्हीवर आजही कोणताही अश्लील सीन आल्यास ते तिथून निघून जातात.
advertisement
9/9
ते म्हणाले होते की, "गौहर आमच्या कुटुंबाचा भाग आहे आणि तिचा आदर करणे आमची जबाबदारी आहे, पण मी नाही तर जैद तिला काम करण्यापासून रोखू शकतो."
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'ती काम करणार की नाही ते माझा मुलगा ठरवेल!' गौहरच्या सासऱ्याचं बोलणं ऐकून चाहते खवळले, नेटकऱ्यांनी धु-धु धुतलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल