अंडरवर्ल्ड डॉनची गर्लफ्रेंड होती 'ही' अभिनेत्री; दिग्दर्शकानं काम द्यायला नकार देताच त्याच्यावर झाडल्या गोळ्या
- Published by:Nishigandha Kshirsagar
Last Updated:
Dawood Ibrahim Love Affairs : बॉलिवूड आणि अंडरवर्ल्डचं नातं खूप जुनं आहे. या इंडस्ट्रीतील अनेक कलाकार अंडरवर्ल्डच्या संपर्कात आले. विशेषतः अभिनेत्रींची नावं अनेकदा दाऊदसोबत जोडली गेली. अनेकांचे दाऊदसोबतचे फोटो व्हायरल झाले आणि त्यांच्या संबंधांची चर्चा झाली. कोण होत्या या अभिनेत्री जाणून घ्या.
advertisement
1/9

दाऊद इब्राहिम अनेक वर्षांपासून पाकिस्तानातील कराचीमध्ये राहत असल्याची माहिती आहे. मुंबईत असताना त्याचा बॉलीवूड सिनेसृष्टीवर चांगलाच दबदबा होता. अनेक स्टार्सच्या वैयक्तिक आयुष्यात तो ढवळाढवळ करत राहिला. त्यात अनेक अभिनेत्रींचं नाव देखील चर्चेत होतं.
advertisement
2/9
‘राम तेरी गंगा मैली’ने प्रसिद्ध झालेली अभिनेत्री म्हणजे मंदाकिनी. ती अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या प्रेमात पडली होती. ती बॉलीवूडमध्ये चांगली हिट झाली असती, पण दाऊदसोबतचा एक फोटो व्हायरल झाल्यानंतर तिच्या करिअरला ग्रहण लागलं.
advertisement
3/9
मंदाकिनीने दाऊदसोबतच्या अफेअरला नकार दिला होता, पण त्याचा फारसा चांगला परिणाम झाला नाही.
advertisement
4/9
दाऊदसोबतच्या तिच्या जवळीकीचा तिच्या कारकिर्दीवर नकारात्मक परिणाम झाला आणि 1996 नंतर ती अचानक इंडस्ट्रीतून गायब झाली. बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर तिने 1990 मध्ये एका साधूशी लग्न केलं. ती आता दलाई लामांची भक्त असून योग शिकवते.
advertisement
5/9
पाकिस्तानी अभिनेत्री अनिता अयुबचं नावही दाऊद इब्राहिमसोबत जोडलं गेलं होतं. लोक तिला दाऊदची गर्लफ्रेंड म्हणूनच ओळखायचे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बॉलीवूड चित्रपट 'प्यार का तराना' फेम अभिनेत्री डॉनची जवळची मैत्रीण होती. पण या अफवांचा अभिनेत्रीच्या वैयक्तिक आयुष्यावर नकारात्मक परिणाम झाला.
advertisement
6/9
याच कारणामुळं चित्रपट निर्माते जावेद सिद्दीकी यांनी अनिता अयुबला त्यांच्या चित्रपटात घेण्यास नकार दिला होता. तेव्हा या दिग्दर्शकाला दाऊद इब्राहिमच्या माणसांनी गोळ्या झाडून मारलं होतं.
advertisement
7/9
पाकिस्तानच्या फॅशन मॅगझिन 'फॅशन सेंट्रल'च्या रिपोर्टनुसार, अनिताचा 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातही हात होता.
advertisement
8/9
'वीराना' चित्रपटातून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री जस्मिन धुन्ना हिनं दाऊद इब्राहिमला कधीच डेट केलं नाही, मात्र डॉन या अभिनेत्रीकडे आकर्षित झाल्याचं बोललं जातं. जस्मिनने 1979 मध्ये आलेल्या 'सरकारी मेहमन' या चित्रपटातून पदार्पण केलं होतं. 1988 मध्ये 'वीराना' रिलीज झाल्यानंतर ती रातोरात स्टार बनली, पण या सिनेमानंतर ती अचानक फिल्मी दुनियेतून गायब झाली.
advertisement
9/9
जास्मिन दाऊद आणि त्याच्या साथीदारांवर नाराज होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ती कंटाळून देश सोडून निघून गेली. आता ती कुठेय हे कोणालाच माहिती नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
अंडरवर्ल्ड डॉनची गर्लफ्रेंड होती 'ही' अभिनेत्री; दिग्दर्शकानं काम द्यायला नकार देताच त्याच्यावर झाडल्या गोळ्या