हेमा मालिनीआधी 'या' परम सुंदरीवर 'लट्टू' होते धर्मेंद्र, 40 वेळा पाहिलेला तिचा एकच सिनेमा, ती अभिनेत्री कोण?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
अभिनेते धर्मेंद्र यांना हेमा मालिनीच्या आधी बॉलिवूडची एक फेमस अभिनेत्री आवडली होती. त्या अभिनेत्रीचा तो एक सिनेमा पाहण्यासाठी ते अनेक किलोमीटर लांब जायचे. तिचा एक सिनेमा त्यांनी तब्बल 40 वेळा पाहिला होता.
advertisement
1/9

हिंदी चित्रपटसृष्टीत एक देखणा अभिनेता आणि हुशार अभिनेता अशी धर्मेंद्र यांची ओळख आहे. त्यांच्या देखण्या चेहऱ्याने आणि शरीरयष्टीमुळे चाहते त्यांना बॉलिवूडचा ही-मॅन म्हणू लागले. ते नॅशनल क्रश होते. अनेक तरुणी त्यांची एक झलक पाहण्यासाठी वाट पाहायच्या.
advertisement
2/9
धर्मेंद्र यांनी दोन लग्न केली. त्यांचं पहिलं लग्न प्रकार कौर यांच्याशी झालं होतं. तर अभिनेत्री हेमा मालिनी या त्यांच्या दुसऱ्या पत्नी. पण तुम्हाला माहिती आहे का हेमा मालिनीशी लग्न करण्याआधी धर्मेंद्र यांनी दुसरीच अभिनेत्री आवडली होती. धर्मेंद्र यांना चित्रपटसृष्टीत आकर्षित करणारी ती तिच्या काळातील दिग्गज नायिका कोण होती.
advertisement
3/9
धर्मेंद्र यांच्या कारकिर्दीच्या शिखरावर असताना लाखो महिला त्यांच्या प्रेमात पडल्या होत्या. त्याच्या देखण्या लूक आणि उत्कृष्ट अभिनयामुळे ते फेमस झाले होते. अभिनेते म्हणून त्यांनी नाव कमावलं होतं. तरुण मुली त्यांच्याशी लग्न करण्याचं स्वप्न पाहायच्या. अशात एका अभिनेत्रीचं हृदय त्यांच्यासाठी धडधडत होतं.
advertisement
4/9
धर्मेंद्र यांचं हेमा मालिनी यांच्यावर प्रेम होतं हे त्यांनी कबूल केलं होतं. पण त्यांच्यावर प्रेम असणारी ही अभिनेत्री म्हणजे सुरैया. अभिनेत्री सुरैयानं तिच्या शानदार कारकिर्दीत असंख्य सिनेमांमध्ये काम केलं. अनेक गाणी देखील गायली.
advertisement
5/9
धर्मेंद्र यांनी पहिल्यांदाच सुरैया यांना पडद्यावर पाहिलं तेव्हा त्यांनी तिला मोहित केले. धर्मेंद्र यांनी सुरैयाचा 1949 साली आलेला 'दिल्लगी' हा सिनेमा 40 वेळा पाहिला. धर्मेंद्रने कबूल केलं होतं की ते सुरैयाला पाहण्यासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करत हेते.
advertisement
6/9
धर्मेंद्र सुरैयावर प्रेम करत असताना, ती मात्र देव आनंदवर मोहित झाली. 1948 ते 1951 पर्यंत त्यांचं अफेअर होतं. दोघांनी पळून जाऊन लग्न करण्याचा विचारही केला होता पण त्यांचं कुटुंब त्यांच्या प्रेमात अडथळा ठरले. सुरैयाने पुन्हा लग्नाचा विचार केला नाही. 1963 मध्ये तिनं अभिनयातून रिटायरमेंट घेतली.
advertisement
7/9
धर्मेंद्रप्रमाणेच सुरैयाचीही एक उल्लेखनीय कारकीर्द होती. त्यांनी 70 हून अधिक सिनेमांमध्ये काम केलं. 338 गाणी गायली. देव आनंदसोबतची त्यांची जोडी एक प्रसिद्ध होती.
advertisement
8/9
धर्मेंद्र यांचे नाव सुपरस्टार मीना कुमारीशीही जोडलं गेलं होतं. परंतु हेमा मालिनीसोबतची त्यांची प्रेमकहाणी सर्वात जास्त चर्चेत होती. 1970 मध्ये आलेल्या "तुम हसीन मैं जवान" सिनेमाच्या सेटवर दोघांची पहिली भेट झाली.
advertisement
9/9
धर्मेंद्र आधीच विवाहित होते आणि त्यांना चार मुले होती. तरीही ते हेमा मालिनीच्या प्रेमात पडण्यापासून ते स्वत:ला रोखू शकले नाहीत. धर्मेंद्रची पहिली पत्नी प्रकाश कौरने त्यांना घटस्फोट देण्यास नकार दिल्याने हेमा मालिनी यांनी 1980 मध्ये धर्मांतर करुन धर्मेंद्र यांच्याशी लग्न केलं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
हेमा मालिनीआधी 'या' परम सुंदरीवर 'लट्टू' होते धर्मेंद्र, 40 वेळा पाहिलेला तिचा एकच सिनेमा, ती अभिनेत्री कोण?