वडील मुख्यमंत्री, मुलानं कमवलं बॉलिवूडमध्ये नाव; आज इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख
- Published by:Nishigandha Kshirsagar
Last Updated:
बॉलीवूडमध्ये असा एक अभिनेता आहे ज्याचा जन्म एका राजकारणी घरात झाला होता. पण त्याने वडिलांचा वारसा पुढं चालवण्याऐवजी बॉलिवूडमध्ये एंट्री घेण्याचा निर्णय घेतला. हा अभिनेता आहे रितेश देशमुख. 17 डिसेंबर 1978 रोजी जन्मलेल्या रितेशने आपली वेगळी ओळख निर्माण केली. आज 45 वर्षांच्या रितेशची संपत्ती किती आहे जाणून घ्या.
advertisement
1/8

बॉलीवूडमध्ये असा एक अभिनेता आहे ज्याचा जन्म एका राजकारणी घरात झाला होता. पण त्याने वडिलांचा वारसा पुढं चालवण्याऐवजी बॉलिवूडमध्ये एंट्री घेण्याचा निर्णय घेतला. हा अभिनेता आहे रितेश देशमुख.
advertisement
2/8
रितेश देशमुखचे वडील विलासराव देशमुख अनेक वर्षे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. रितेशला हवे असते तर जास्त मेहनत न करता राजकारणात आपली कारकीर्द घडवता आली असती. पण त्याने अभिनयाचा मार्ग निवडला आणि स्वत:च्या जोरावर स्थान निर्माण केलं.
advertisement
3/8
रितेशने 2000 मध्ये 'तुझे मेरी कसम' या चित्रपटातून करिअरला सुरुवात केली. रितेशला सुरुवातीला अनेक अडचणींचा सामना करावा लागला असला तरी लोक त्याला मुख्यमंत्र्यांचा मुलगा म्हणून ट्रोल करत होते. पण रितेशने मेहनत घेऊन बॉलिवूडमध्ये नाव कमावलं.
advertisement
4/8
तुझे मेरी कसम या चित्रपटातून करिअरची सुरुवात करणाऱ्या रितेशने आतापर्यंत 50 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याने आजवर अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत.
advertisement
5/8
फोर्ब्सच्या रिपोर्टनुसार, भारतातील 100 आघाडीच्या सेलिब्रिटींच्या यादीत रितेशचाही समावेश आहे. त्याची आजची एकूण संपत्ती 17 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 138 कोटी रुपये आहे.
advertisement
6/8
रितेश देशमुखचे मासिक उत्पन्न 2 कोटींहून अधिक आहे. चित्रपटसृष्टीतील मोजक्या अभिनेत्यांपैकी तो एक चित्रपटासाठी मोठी रक्कम आकारतो.
advertisement
7/8
रितेश एका चित्रपटासाठी 6 ते 7कोटी रुपये घेतो. याशिवाय तो ब्रँड प्रमोशनमधूनही चांगली कमाई करतो. एका ब्रँड एंडोर्समेंटसाठी तो 2 कोटी रुपये घेतो. याशिवाय तो टीव्ही शो, अवॉर्ड शो होस्ट करूनही चांगली कमाई करतो.
advertisement
8/8
रितेश आणि जिनिलिया दोघांची संपत्ती 268 कोटी इतकी आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
वडील मुख्यमंत्री, मुलानं कमवलं बॉलिवूडमध्ये नाव; आज इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख