John Abraham : जॉन अब्राहमचं एक वाक्य अन् अमेरिकेत उडाली खळबळ, असं म्हणाला तरी काय? थेट ट्रम्पवर बरसला
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
John Abraham on Donald Trump : जॉन अब्राहमने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि भारतावरील त्यांच्या ५०% टॅरिफबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.
advertisement
1/6

ओटीटी </a>प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे." width="750" height="938" /> मुंबई: बॉलिवूडचा फिटनेस आयकॉन आणि अभिनेता जॉन अब्राहम सध्या त्याच्या 'तेहरान' या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. स्वातंत्र्यदिनाच्या एक दिवस आधी म्हणजेच १४ ऑगस्ट रोजी हा चित्रपट 'झी ५' या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.
advertisement
2/6
याच प्रमोशनच्या निमित्ताने 'आयडिया एक्स्चेंज' या कार्यक्रमात जॉन अब्राहमने अनेक गोष्टींबद्दल मनमोकळेपणाने संवाद साधला. यावेळी त्याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि भारतावरील त्यांच्या ५०% टॅरिफबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.
advertisement
3/6
रशियाकडून तेल खरेदी केल्यामुळे अमेरिकेने भारतावर ५०% टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला आहे. यावर जॉन अब्राहमने आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे. 'आयडिया एक्स्चेंज'च्या प्रोमोमध्ये तो म्हणतो, "अमेरिकेचा शत्रू असणं धोकादायक आहे, पण अमेरिकेचा मित्र असणं घातक आहे. तुम्ही कधीच सांगू शकत नाही की ते कोणत्या बाजूला जातील."
advertisement
4/6
जॉनने आपल्या 'तेहरान' चित्रपटातील एक किस्साही सांगितला, "आमच्या चित्रपटात इस्रायली कलाकारांनी इस्रायली आणि इराणी कलाकारांनी इराणी भूमिका साकारल्या. पण आम्ही सर्व एकत्र जेवलो आणि सगळे आनंदी होतो, कोणतीही समस्या नव्हती. अशा गोष्टी पाहिल्यावर वाटतं की, या जगात नेमकं काय चाललंय? आपले मित्र नेहमीच नियम बदलत असतात."
advertisement
5/6
जॉनने पुढे सांगितलं, "मला माहीत नाही की त्यांनी गेल्या ८ तासात पुन्हा नियम बदलले आहेत की नाही, पण आजही तो टॅरिफ ५०% वरच आहे."
advertisement
6/6
'तेहरान' आधी जॉन अब्राहम 'द डिप्लोमेट' या चित्रपटात दिसला होता. या चित्रपटाला समीक्षक आणि काही प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला, पण बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट जादू दाखवू शकला नाही. पण ओटीटीवर रिलीज झाल्यावर या चित्रपटाला खूप प्रेम मिळालं आणि तो बराच काळ ट्रेंडिंगमध्ये होता. आता त्याच्या 'तेहरान' या चित्रपटाबद्दलही प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
John Abraham : जॉन अब्राहमचं एक वाक्य अन् अमेरिकेत उडाली खळबळ, असं म्हणाला तरी काय? थेट ट्रम्पवर बरसला