Madhuri Dixit : 'ऐक, तुला ब्लाऊज काढावं लागेल', जेव्हा डायरेक्टरने माधुरीकडे केलेली विचित्र मागणी
- Published by:Minal Gurav
Last Updated:
आजही लाखो दिलो की धडकन असलेल्या माधुरी दीक्षितला कधी काळी सगळ्यांसमोर ब्लॉऊज उतरवण्याची वेळ आली होती. काय आहे तो किस्सा.
advertisement
1/11

माधुरी दीक्षित ही बॉलिवूडमधील अशा सुंदरींपैकी एक आहे जिच्या कारकिर्दीची सुरुवात एका फ्लॉप सिनेमाने झाली होती. यानंतर तिला तिच्या कुटुंबाकडून खूप टोमणे ऐकावे लागले म्हणून तिने काही काळ चित्रपटांपासून स्वतःला दूर केले.
advertisement
2/11
चार वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर 1988 मध्ये 'तेजाब' हा हिट सिनेमातून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आली. तिने प्रेक्षकांची टाकलेली मोहिनी आजही कमी झालेली नाही. त्यानंतर ती अनेक हिट चित्रपटांमध्ये दिसली. पण तिचा असा एक हिट चित्रपट ज्यामुळे तिला मनस्तान सहन करावा लागला.
advertisement
3/11
आपण अभिनेत्री माधुरी दीक्षितबद्दल बोलत आहोत. एका चित्रपटात दिग्दर्शकाने तिच्याकडे एक वेगळीच मागणी केली होती. सुरुवातीला माधुरीने दिग्दर्शकाच्या मागणीला मान्यता दिली, परंतु जेव्हा तिच्या स्वतःच्या निर्णयाची वेळ आली तेव्हा ती मागे हटली. माधुरीच्या या वागण्यामुळे दिग्दर्शकाने तिला चित्रपटातून काढून टाकण्याचा निर्णय घेतला.
advertisement
4/11
चित्रपटाच्या पटकथेच्या मागणीनुसार, अभिनेत्रींना अनेकदा त्यांना नको असलेले दृश्ये करण्यास भाग पाडले जाते. माधुरी दीक्षितने नेहमीच तिची विनम्र प्रतिमा राखली आहे. 1989 मध्ये एक चित्रपट प्रदर्शित झाला होता ज्यामध्ये दिग्दर्शकाने धक-धक गर्लला ब्लाउज काढण्याची मागणी केली होती.
advertisement
5/11
आश्चर्याची गोष्ट म्हणजे, सुरुवातीला तिने होकार दिला, पण जेव्हा ते कृतीत करण्याची वेळ आली तेव्हा मात्र तिने नकार दिला. दिग्दर्शकाने कोणाचेही ऐकले नाही आणि माधुरीला स्पष्टपणे सांगितले की तो सीन करा किंवा चित्रपट सोडून दे.
advertisement
6/11
त्यावेळी टिनू आनंद यांच्या "शानख्त" नावाच्या चित्रपटासाठी बिग बी आणि माधुरी दीक्षित यांना मुख्य भूमिकेत घेतले होते. जेव्हा टिनू आनंदने माधुरीला स्क्रिप्ट वाचून दाखवली तेव्हा तिने ब्लाउज काढण्याच्या सीनचं तिने समर्थन केलं होतं. शूटिंग दरम्यान ती नकार देत होती.
advertisement
7/11
रेडिओ नशाला दिलेल्या एका जुन्या मुलाखतीत टिनू आनंद यांनी याबद्दल सांगितलं. ते म्हणाले, "अमिताभ बच्चनला साखळ्यांनी बांधलेला सीन आठवले. तो माधुरीला वाचवण्याचा प्रयत्न करतो, परंतु गुंड त्यांच्यावर मात करतात. माधुरी हस्तक्षेप करते आणि म्हणते, "साखळ्यांनी बांधलेल्या एकट्या पुरूषावर हल्ला का करायचा जेव्हा त्याच्या समोर एक महिला उभी असते?"
advertisement
8/11
टिनू यांनी दावा केला की त्याने चित्रपट साईन करण्यापूर्वी माधुरीला संपूर्ण सीन समजावून सांगितला होता. ते म्हणाले, "मी माधुरीला सांगितले होते की तुला पहिल्यांदाच तुझा ब्लाउज काढावा लागेल. आम्ही तुला ब्रा घालून दाखवू आणि मी गवताच्या ढिगाऱ्यामागे किंवा इतर कोणत्याही गोष्टीमागे काहीही लपवणार नाही. कारण तू स्वतःला त्या माणसाला मदत करण्यासाठी ऑफर करत आहेस. म्हणून ही एक खूप महत्त्वाची परिस्थिती आहे आणि मला पहिल्याच दिवशी ते शूट करायचे आहे. तिने तेव्हा त्या सीनसाठी होकार दिला."
advertisement
9/11
पहिल्या दिवशी सीन शूट करायचा होता पण माधुरीने नकार दिला. "मी विचारले काय झाले," ती म्हणाली, "टिनू, मला हे सीन करायचे नाही." मी म्हणालो, "मला माफ करा, कारण तुला हे सीन करावे लागतील." ती म्हणाली, "नाही, मला ते करायचे नाही." मी उत्तर दिले, "ठीक आहे, सामान बांध, चित्रपटाला निरोप द्ये. मी माझे शूट रद्द करेन."
advertisement
10/11
अमिताभ बच्चनने परिस्थिती नियंत्रीत करण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, "असू दे. तू तिच्याशी का वाद घालत आहेस? जर तिला काही आक्षेप असेल तर..." मी म्हणालो, "जर तिला काही आक्षेप असेल तर तिने चित्रपट साईन करण्यापूर्वीच करायला हवा होता."
advertisement
11/11
माधुरीच्या सेक्रेटरीने नंतर येऊन टिनूला सांगितले की माधुरी हा सीन करायला तयार आहे. चित्रपट प्रदर्शित झाला पण प्रेक्षकांना प्रभावित करण्यात तो अयशस्वी ठरला आणि तो फ्लॉप ठरला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Madhuri Dixit : 'ऐक, तुला ब्लाऊज काढावं लागेल', जेव्हा डायरेक्टरने माधुरीकडे केलेली विचित्र मागणी