Shah Rukh Khan : अभिनयातच नाही, तर संपत्तीतही 'किंग'! जगभरातील स्टार्सना मागे टाकत शाहरुख बनला अब्जाधीश
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Shah Rukh Khan Net worth Hurun India Rich List 2025: 'किंग खान' शाहरुख खान पुन्हा एकदा चर्चेत आहे. बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांपैकी एक शाहरुख आहे. मात्र आता तो जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत आला आहे.
advertisement
1/7

'किंग खान' शाहरुख खान पुन्हा एकदा चर्चेत आहे. बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांपैकी एक शाहरुख आहे. मात्र आता तो जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत आला आहे. शाहरुख खान आता अब्जाधीश झाला आहे.
advertisement
2/7
हुरुन इंडिया रिच लिस्ट 2025 जाहीर झाली आहे. या लिस्टनुसार गेल्या वर्षीच्या तुलनेत शाहरुखने मोठी झेप घेतली आहे. यंदा त्याने जागतिक स्टार्ससुद्धा मागे टाकले आहे.
advertisement
3/7
हुरुन इंडिया रिच लिस्ट 2025 नुसार, शाहरुख खान अब्जाधीश क्लबमध्ये सामील झाला आहे. त्याची एकूण संपत्ती 12,490 कोटी सुमारे $1.4 अब्ज)आहे. या यादीत तो एकमेव भारतीय अभिनेता आहे ज्याने इतकी मोठी झेप घेतला आहे.
advertisement
4/7
हुरुन इंडिया रिच लिस्टमध्ये शाहरुखने अनेक जागतिक स्टार्स मागे टाकले आहेत. यामध्ये टेलर स्विफ्ट ($1.3 अब्ज), अर्नोल्ड श्वार्झनेगर ($1.2 अब्ज), जेरी सेनफेल्ड ($1.2 अब्ज) आणि सेलेना गोमेझ ($720 दशलक्ष) यांचा समावेश आहे.
advertisement
5/7
शाहरुखसोबत यादीत बॉलिवूडचे तीन प्रमुख स्टार्स आहेत. जूही चावलाची संपत्ती: 7.790 कोटी आहे तर ऋतिक रोशनची 2160 कोटी रुपये आहे.शाहरुख यांपेक्षा खूप पुढे आहे. त्याने फक्त भारतातच नव्हे तर जागतिक स्तरावरही आपली संपत्ती सिद्ध केली आहे.
advertisement
6/7
शाहरुख खान गेल्या 30 वर्षांपासून बॉलिवूडमध्ये आहे. 59 व्या वर्षी अब्जाधीश झालेला शाहरुख खान आपली लोकप्रियता आणि प्रभाव कायम ठेवत आहे. त्याची मेहनत, प्रतिभा आणि दूरदृष्टी त्याला फक्त भारतातच नव्हे, तर जागतिक स्तरावरही ओळख करून दिली आहे.
advertisement
7/7
दरम्यान, शाहरुख लवकरच मुलगी सुहाना खानसोबत चित्रपट ‘किंग’मध्ये दिसणार आहे. त्याच्या आगामी सिनेमासाठी प्रेक्षक आतुरनेनं वाट पाहत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Shah Rukh Khan : अभिनयातच नाही, तर संपत्तीतही 'किंग'! जगभरातील स्टार्सना मागे टाकत शाहरुख बनला अब्जाधीश