माधुरी दीक्षितच्या या सुपरहिट गाण्याचं थेट पाकिस्तानशी कनेक्शन, ते काय?
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Madhuri Dixit : 90 च्या दशकातील 'मेरा पिया घर आया' हे गाणं आजही अनेकांच्या मनात घर करून बसलेलं आहे. पण या गाण्याचं थेट पाकिस्तानची कनेक्शन असल्याचं खूप कमी लोकांना माहिती आहे.
advertisement
1/7

काही हिंदी गाणी अशी असतात की ती ऐकताच आपोआप पाय थिरकू लागतात. 90 च्या दशकातील 'मेरा पिया घर आया' हे यापैकीचं एक गाणं. माधुरी दीक्षितच्या या गाण्याने देशभरात धुमाकूळ घातला होता.
advertisement
2/7
'मेरा पिया घर आया' हे 1995 मध्ये आलेल्या 'याराना' या चित्रपटातील गाणं आहे. आजही अनेक पार्ट्या ते लग्नसमारंभात हे गाणं ऐकू येतं. पण तुम्हाला ठाऊक आहे का, हे गाणं पूर्णपणे बॉलिवूडची निर्मिती नव्हतं, तर त्याचं मूळ दडलेलं होतं एका सूफी कव्वालीत, जी स्वतः उस्ताद नुसरत फतेह अली खान यांनी गायली होती.
advertisement
3/7
'मेरा पिया घर आया' हे काही नवीन गाणं नाही, तर नुसरत फतेह अली खान यांच्या सुप्रसिद्ध कव्वालीचं चित्रपट रूप आहे. नुसरत साहेबांच्या आवाजाची जादू आजही अनेकांना वेड लावते. 80 आणि 90 च्या दशकात ही कव्वाली सूफी संगीताची ओळख बनली होती.
advertisement
4/7
याराना चित्रपटासाठी संगीतकार आनंद मिलिंद यांनी या कव्वालीची धून घेऊन तिला एक डान्स नंबरचं रूप दिलं, तेव्हा कदाचित त्यांनाही कल्पना नव्हती की हे गाणं इतिहास घडवेल. लाल ड्रेसमधील माधुरी दीक्षितचा परफॉर्मन्स, तिचे अप्रतिम हावभाव आणि सोज्वळता या सगळ्यांनी मिळून या गाण्याला आयकॉनिक बनवलं.
advertisement
5/7
'मेरा पिया घर आया' या गाण्याने केवळ चित्रपटाला यश दिलं नाही, तर माधुरीला “डान्स क्वीन”चा दर्जाही मिळवून दिला. आज तीन दशकांनंतरही जेव्हा मेरा पिया घर आया चा कोणतीही क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होते, तेव्हा लोक त्या बीट्सवर थिरकताना दिसून येतात.
advertisement
6/7
'मेरा पिया घर आया' या गाण्याचा रिमेक 25 वर्षांनंतर सनी लिओनीनंदेखील केला होता. 'मेरा पिया घर आया 2.0' या गाण्यानेदेखील चांगलाच धमाका केला होता. या गाण्यात सनी लिओनीचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळाला होता.
advertisement
7/7
'मेरा पिया घर आया' हे माधुरी दीक्षित सुपरहिट साँग पाकिस्तानी उस्ताद नुसरत फतेह अली खान यांच्या कव्वालीची कॉपी आहे. या गाण्यानेच माधुरी 'डान्स क्वीन' म्हणून ओळखली जाऊ लागली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
माधुरी दीक्षितच्या या सुपरहिट गाण्याचं थेट पाकिस्तानशी कनेक्शन, ते काय?