TRENDING:

माधुरी दीक्षितवर प्रेम, पण काकाच्या मुलीशी केलं लग्न; आज मुलगी अन् जावई बॉलिवूडचे सुपरस्टार

Last Updated:
bollywood Untold Story :  अशी व्यक्ती जी माधुरी दीक्षितचा खूप मोठी फॅन होती. ते तिच्यावर एकतर्फी प्रेम करत होते. यशाच्या शिखरावर असताना या व्यक्तीने संधी गमावली आणि नैराश्यात गेले. त्याने आपला व्यवसाय सोडून काम करायला सुरुवात केली. दरम्यान त्यांनी आपल्या चुलत बहिणीशी लग्न केलं. त्यानंतर ते संसारात रमले. त्यांच्या मुलीनं स्ट्रगल करून बॉलिवूडमध्ये नाव कमावलं. तिचा पहिलाच सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला. आज ही अभिनेत्री सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. 
advertisement
1/5
माधुरीवर प्रेम, पण काकाच्या मुलीशी केलं लग्न; आज मुलगी-जावई बॉलिवूडचे सुपरस्टार
आपण बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणबद्दल बोलत आहोत. आज दीपिकाची नाही तर तिच्या आई-वडीलांची लव्ह स्टोरी आम्ही तुम्हाला सांगणार आहतो. बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण हे त्यांच्या कारकिर्दीच्या शिखरावर असताना पराभव पत्करताना खूप दुःखी झाले. नंतर त्यांनी त्यांची चुलत बहीण उज्ज्वला हिच्याशी लग्न केले.
advertisement
2/5
दीपिकाचे वडील प्रकाश पदुकोण यांनी स्वतः एका मुलाखतीत या लग्नाचा खुलासा केला होता की, त्यांची पत्नी उज्ज्वला ही त्यांची चुलत बहीण आहे. 'जगातील नंबर 1 क्रमांकाची खेळाडू असूनही मी पहिल्यांदाच राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत पराभव पत्करला. मी बॅडमिंटन खेळणे जवळजवळ बंद केले. मी माझ्या चुलत बहीण उज्ज्वला हिच्याशी नैराश्यात लग्न केलं. लग्नानंतर आम्ही कोपनहेगनला गेलो. मी 1986 पर्यंत तिथे काम केलं. दरम्यान, दीपिकाचा जन्म तिथेच झाला. मी 1989 मध्ये रिटायर झालो.'
advertisement
3/5
ही मुलाखत बाहेर आल्यानंतर सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली.  चुलत बहिणीशी लग्न करणे ही दक्षिण भारतात एक सामान्य पद्धत आहे. काहींही याचं समर्थन केलं काहींनी संताप व्यक्त केला.  
advertisement
4/5
2016 मध्ये इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत दीपिकाने सांगितले होते की, माधुरी दीक्षित तिच्या वडिलांची क्रश होती.  दीपिकाने म्हटले होते की, "जेव्हा माझ्या वडिलांना माधुरी दीक्षितच्या लग्नाची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी स्वतःला बाथरूममध्ये कोंडून घेतलं होतं. ते खूप रडत होते. नंतर आमच्या फॅमिलीनं बराच काळ त्यांची खिल्ली उडवली होती." 
advertisement
5/5
सध्या बॉलिवूडमध्ये सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक दीपिका पदुकोण आहे. 2007 मध्ये आलेल्या 'ओम शांती ओम' चित्रपटातून तिनं डेब्यू केला. ज्यात शाहरुख खान हिरो होता. त्यानंतर दोघांनीही 'चेन्नई एक्सप्रेस', 'हॅपी न्यू इयर', 'जवान', 'पठाण' सारख्या अनेक सुपरहिट सिनेमात एकत्र दिले आहेत. दीपिका पदुकोणने 2018 मध्ये इटलीमध्ये शाही शैलीत बॉलीवूड स्टार रणवीर सिंगशी लग्न केलं. काही महिन्यांआधी दीपिका आई झाली. 
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
माधुरी दीक्षितवर प्रेम, पण काकाच्या मुलीशी केलं लग्न; आज मुलगी अन् जावई बॉलिवूडचे सुपरस्टार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल