टॉयलेट क्लीनरला शाहरुख खानने बनवलं सुपरस्टार, आज पाकिस्तानातील सगळ्यात महागडी अभिनेत्री
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
एका पाकिस्तानी अभिनेत्रीनं एकेकाळी मॉलमध्ये फरशी पुसण्याचं, टॉयलेट स्वच्छतेचं काम केलं होतं. नंतर तिने बॉलिवूडमध्ये शाहरुख खानसोबत एक चित्रपट केला आणि तिचे दिवस पलटले.
advertisement
1/10

सिनेइंडस्ट्रीमध्ये एखादी चांगली संधी कलाकाराचं नशीब उजळून टाकते. मग आधी केलेले कष्ट कोणाच्या फारसे लक्षात राहत नाहीत.
advertisement
2/10
एका पाकिस्तानी अभिनेत्रीनंही एकेकाळी मॉलमध्ये फरशी पुसण्याचं, टॉयलेट स्वच्छतेचं काम केलं होतं. नंतर तिने बॉलिवूडमध्ये शाहरुख खानसोबत एक चित्रपट केला आणि तिचे दिवस पलटले. सध्या ती पाकिस्तानातील सर्वांत जास्त कमाई करणारी अभिनेत्री आहे.
advertisement
3/10
नशिबाची कवाडं खुली होण्यासाठी एक संधीदेखील पुरेशी असते. असाच काहीसा प्रकार अभिनेत्री माहिरा खानसोबत घडला. माहिरा पाकिस्तानी अभिनेत्री आहे. तिनं अनेक पाकिस्तानी चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
advertisement
4/10
शाहरुखच्या ‘रईस’ चित्रपटाद्वारे 2017 मध्ये तिनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. माहिरा आता पाकिस्तानातील सर्वाधिक कमाई करणारी अभिनेत्री बनली आहे.
advertisement
5/10
मात्र, इथपर्यंतचा तिचा प्रवास अनेकांना प्रेरणादायी ठरू शकेल असा आहे. ही पाकिस्तानी अभिनेत्री आज भारतातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तसंच पाकिस्तानातील पंजाबी चित्रपटसृष्टीतील पहिला 100 कोटी रुपयांचा चित्रपट देणारीही तीच आहे.
advertisement
6/10
चित्रपटसृष्टीतील करिअर सुरू होण्याआधी तिनं एका रेस्टॉरंटमध्ये काम केलं होतं. तसंच अमेरिकेत असताना टॉयलेटची स्वच्छता, मॉलमध्ये फरशी पुसणं ही कामंही तिने केली होती.
advertisement
7/10
ती 17 वर्षांची असताना उच्चशिक्षणासाठी कॅलिफोर्नियामध्ये गेली होती. तिथे तिला सुरुवातीला खूप संघर्ष करावा लागला. ‘फुशिया’ मासिकाला दिलेल्या एका मुलाखतीत तिनं त्याबाबत सांगितलं, की “माझ्या जीवनात खडतर काळही आला होता, हे लोकांना माहीत व्हावं असं मला वाटतं. त्या काळात मी फरशी पुसण्याचं काम केलं. लॉस एंजेलिसमध्ये वास्तव्याच्या काळात टॉयलेट स्वच्छतेचं कामही केलं.”
advertisement
8/10
माहिरा सांगते, की तिनं आणि तिच्या भावानं एका डॉलरमध्ये जेवण घेऊन ते वाटून खाल्लं होतं. “हा प्रवास सोपा निश्चितच नव्हता. लोक मी विनम्र आहे असं म्हणतात, पण मला आलेल्या अनुभवांमुळे मी तशी झाले.”
advertisement
9/10
अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल ठेवण्यासाठी माधुरी दीक्षितकडून प्रेरणा मिळाल्याचं दुसऱ्या एका मुलाखतीत तिनं म्हटलं होतं. माधुरीच्या ‘धक धक करने लगा’ या सुपरहिट गाण्यामुळेच तिनं अभिनय क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतल्याचं माहिरा सांगते.
advertisement
10/10
पाकिस्तानात तसंच आता भारतातही ती लोकप्रिय अभिनेत्री आहे. एकेकाळी मॉलमधली फरशी पुसून पैसे कमावलेल्या या अभिनेत्रीकडे आज 58 कोटी रुपयांची संपत्ती आहे. ती एका चित्रपटाकरता तीन ते पाच लाख रुपयांचं मानधन घेते, असं म्हटलं जातं. माहिराचा हा प्रवास अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरू शकतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
टॉयलेट क्लीनरला शाहरुख खानने बनवलं सुपरस्टार, आज पाकिस्तानातील सगळ्यात महागडी अभिनेत्री