LIVE इव्हेंटमध्येच बेशुद्ध पडला अभिनेता, आता थेट व्हेंटिलेटरवर! झाली भयानक अवस्था
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Actor got Heart Attack : लोकप्रिय गायक केकेला लाइव्ह परफॉर्मन्सच्या दरम्यानच हार्ट अटॅक आल्याने स्टेजवर कोसळला होता. रुग्णालयात दाखल करण्याआधीच त्याचं निधन झालं. असाच काहीसा प्रकार एका प्रसिद्ध अभिनेत्यासोबत घडला आहे.
advertisement
1/8

हार्ट अटॅक</a> आल्यामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या मोठी आहे. यामध्ये अनेक सेलिब्रिटींचाही समावेश आहे. सिद्धार्थ शुक्ला, शेफाली जरीवाला, रिमा लागू यांचं हृदयविकाराच्या झटक्याने अचानक निधन झालं." width="640" height="800" /> सध्याच्या घडीला कोणासोबत कधी काय होईल हे सांगता येणं कठीण आहे. गेल्या काही वर्षांमध्ये अचानक हार्ट अटॅक आल्यामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या मोठी आहे. यामध्ये अनेक सेलिब्रिटींचाही समावेश आहे. सिद्धार्थ शुक्ला, शेफाली जरीवाला, रिमा लागू यांचं हृदयविकाराच्या झटक्याने अचानक निधन झालं.
advertisement
2/8
लोकप्रिय गायक केके लाइव्ह परफॉर्मन्सच्या दरम्यानच स्टेजवर कोसळला होता. रुग्णालयात दाखल करण्याआधीच त्याचं निधन झालं. असाच काहीसा प्रकार एका प्रसिद्ध अभिनेत्यासोबत घडला आहे. एका कार्यक्रमात त्यांना हृदयविकाराचा झटका आला.
advertisement
3/8
मल्याळम अभिनेता राजेश केशव याच्यासोबत एक धक्कादायक घटना घडली आहे, ज्यामुळे तो आता व्हेंटिलेटरवर आहे. एका पब्लिक इव्हेंटमध्ये स्टेजवरच तो अचानक बेशुद्ध झाला, ज्यामुळे त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
advertisement
4/8
४७ वर्षांचा राजेश केशव नुकताच एका कार्यक्रमात गेला होता. तिथे स्टेजवर बोलत असतानाच तो अचानक खाली कोसळला. त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याला कार्डियाक अरेस्ट म्हणजेच हृदयविकाराचा झटका आल्याचं सांगितलं.
advertisement
5/8
डॉक्टरांनी त्वरित त्यांची अँजिओप्लास्टी केली आणि आता त्याला आयसीयूमध्ये व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आलं आहे. डॉक्टरांनी सांगितलं आहे की, पुढील ७२ तास त्याच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. त्याची प्रकृती सध्या गंभीर आहे.
advertisement
6/8
राजेश केशवच्या तब्येतीची माहिती त्यांच्या मित्रांनी आणि दिग्दर्शक प्रताप जयलक्ष्मीने सोशल मीडियावर दिली आहे. त्यांनी एक खूप भावूक पोस्ट शेअर केली आहे. प्रताप यांनी लिहिलं आहे, “आमचा लाडका राजेश, ज्याने प्रत्येक थिएटरला आपल्या अभिनयाने जिवंत केलं, तो आज शांत पडून आहे. फक्त एका मशीनच्या मदतीने तो श्वास घेत आहे.”
advertisement
7/8
ते पुढे म्हणाले, “गेल्या रविवारी रात्री, जल्लोष आणि लाइट्सच्या गर्दीत त्याच्यावर काळाने घाला घातला. डॉक्टरांनी सांगितलं की त्याला हृदयविकाराचा झटका आला आहे आणि तेव्हापासून त्याने डोळे उघडले नाहीत. पण आम्ही राजेशला ओळखतो, तो असा उदास राहणारा नाही. ही तीच व्यक्ती आहे, जिने आपल्याला हसवलं, आनंद दिला. तो कोणत्याही हॉस्पिटलच्या बेडवर नाही, तो स्टेजवर आहे, आपल्या आयुष्यात आहे, आपल्या हसण्यात आहे.”
advertisement
8/8
प्रताप जयलक्ष्मी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये चाहत्यांना प्रार्थना करण्याचं आवाहन केलं आहे. “त्याला आता फक्त औषधांची नाही, तर आपल्या प्रेम आणि प्रार्थनेची गरज आहे. त्याला उठावंच लागेल, कारण राजेशसारखा माणूस शो कधीच अर्ध्यात सोडून जाऊ शकत नाही!” असं ते म्हणाले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
LIVE इव्हेंटमध्येच बेशुद्ध पडला अभिनेता, आता थेट व्हेंटिलेटरवर! झाली भयानक अवस्था