Forgotten Actress: हवाई सुंदरीची नोकरी सोडली अन् मॉडेल बनली, सहाय्यक भूमिक झाल्या हिट, पण वैयक्तिक आयुष्य मात्र...
- Published by:Minal Gurav
Last Updated:
जर तुम्ही जुने सिनेमे आणि टेलिव्हिजन शोचे चाहते असाल तर प्रिया तेंडूलकर हे नाव तुम्हाला माहिती असेल. या मराठमोळ्या अभिनेत्रीनं ना केवळ मराठी तर बॉलिवूडमध्येही आपली छाप सोडली. अनेक सहाय्यक भूमिका तिनं अशा पद्धतीनं रंगवल्या की प्रमुख भूमिकेतील कलाकार तिच्यासमोर फिके पडले.
advertisement
1/6

प्रिया म्हणजेच प्रसिद्ध लेखक विजन तेंडूलक यांची मुलगी. प्रियाचा जन्म 19ऑक्टोबर 1954साली मुंबईत झाला. लहानपणापासून अभ्यासात हुशार असलेल्या प्रियानं पॉलिटिकल सायन्समध्ये डिग्री मिळवली.
advertisement
2/6
पण ज्या क्षेत्रात शिक्षण घेतलं त्या क्षेत्रात न जाता प्रियानं वेगळी वाट निवडली. प्रिया फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत होती. त्यानंतर तिनं हवाई सुंदरी म्हणूनही काम केलं. तिची लेखन, वाचन आणि वत्कृत्वाची आवड तिला न्यूज रीडर पर्यंत घेऊन आली. प्रिया अनेक वर्ष दूरदर्शनवर न्यूज रिडर म्हणून काम करत होती. त्यानंतर तिनं मॉडेलिंग क्षेत्रात पाऊल ठेवलं आणि तिथून तिला सिनेमे मिळवण्यास सुरूवात झाली.
advertisement
3/6
प्रियानं 1974साली श्याम बेनेगल यांच्या अंकुर सिनेमातून फिल्मी करिअरला सुरूवात केली. त्यानंतर सरू या सिनेमातून तिला पसंती मिळाली. मराठी सिनेमातही तिनं नाव कमावलं. 'देवता', 'थोरली जाऊ', 'मुंबईचा फौजदार' सारख्या प्रसिद्ध मराठी सिनेमात तिनं काम केलं. तर 'महादान', 'नासूर', 'देवता', 'बेसहारा', 'काल चक्र', 'इंसाफ की जंग', 'मोहरा', 'गुप्त', 'त्रिमूर्ति' सारखे तिचे हिंदी सिनेमेही चांगलेच हिट झाले.
advertisement
4/6
सिनेमांबरोबरच प्रियानं टेलिव्हिजन दुनियेतही आपलं नाव कमावलं. 1985 साली आलेल्या रजनी मालिकेत तिनं काम केलं. को शो इतका हिट झाला की आजही प्रियाला तिच्या रजनी या व्यक्तिरेखेवरून ओळखलं जातं.
advertisement
5/6
प्रियांचं प्रोफेशन आयुष्य जरी यशाच्या शिखरावर असलं तरी तिच्या पर्सनल आयुष्यात मात्र अनेक चढ-उतार आले. 1988 साली प्रियानं करण राजदानबरोबर लग्न केलं. 7 वर्ष त्यांनी संसार केला. त्यानंतर दोघांचा घटस्फोट झाला. नवऱ्यापासून वेगळी झाल्यानंतर प्रियाच्या आई आणि भावाचं निधन झालं.
advertisement
6/6
1999 साली प्रियाला ब्रेस्ट कॅन्सर असल्याचं निदान झालं. ती अनेक कॅन्सरवर उपचार घेत होती. 19 सप्टेंबर 2002 साली प्रियाला हार्ट अटॅक आला आणि तिचं निधन झालं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Forgotten Actress: हवाई सुंदरीची नोकरी सोडली अन् मॉडेल बनली, सहाय्यक भूमिक झाल्या हिट, पण वैयक्तिक आयुष्य मात्र...