TV वर साकारली सीता, सिरीजमध्ये दिले बोल्ड सीन्स; Mirzapur 3 ची सलोनी भाभी नक्की आहे तरी कोण?
- Published by:Nishigandha Kshirsagar
Last Updated:
'मिर्झापूर 3' सध्या रिलीज झाला असून त्याला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. या सीरिजमधील सलोनी भाभीवर सगळ्यांच्या नजरा खिळल्या आहेत. सलोनी भाभीने या सीरिजमध्ये अनेक बोल्ड सीन्सही दिले आहेत. तिचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून ही अभिनेत्री नक्की कोण असाच प्रश्न चाहत्यांना पडला आहे. 'मिर्झापूर 3' ची सलोनी भाभी म्हणजे नक्की कोण हे जाणून घेऊया.
advertisement
1/8

'मिर्झापूर 3' सध्या रिलीज झाला असून त्याला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. या सीरिजमधील सलोनी भाभीवर सगळ्यांच्या नजरा खिळल्या आहेत.
advertisement
2/8
नेहा सरगम उर्फ नेहा दुबेने 'मिर्झापूर 3' मध्ये 'सलोनी भाभी'ची भूमिका साकारली आहे. सलोनीच्या भूमिकेत नेहा शोभली आहे.
advertisement
3/8
नेहाचे या सिरीजमध्ये विजय वर्मासोबत प्रचंड बोल्ड सीन्स दाखवण्यात आले आहेत.
advertisement
4/8
नेहा टीव्ही इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव आहे. 'जैसे चांद छुपा बादल में', 'रामायण', 'महाभारत', 'डोली अरमानो की' अशा मोठ्या मालिकांमध्ये काम केलं आहे. नेहा अभिनयासोबतच चांगली गायिकाही आहे.
advertisement
5/8
2009 मध्ये तिने 'इंडियन आयडॉल 4' साठी ऑडिशनही दिली होती. तसेच 'रामायण जीवन का आधार'मध्ये तिने सीतेची भूमिका तर 'परमावतार श्री कृष्ण'मध्येही लक्ष्मीची भूमिका साकारली आहे.
advertisement
6/8
नेहा सरगम 2010 पासून टीव्ही जगतात सक्रिय आहे. याशिवाय 2022 मध्ये तिने 'यशोमती मैया के नंदलाला'मध्ये आई 'यशोदेची भूमिका साकारली होती.
advertisement
7/8
नेहा सरगमचा जन्म 4 मार्च 1988 रोजी पाटणा, बिहारमध्ये झाला आहे. तिने एमबीए केलं आहे. तिला गायिका व्हायचं होतं. ती प्रशिक्षित शास्त्रीय गायिका आहे. तिचे आजोबा पद्मश्री पंडित सियाराम तिवारी हे देखील पटनाचे सुप्रसिद्ध गायक होते.
advertisement
8/8
नेहा सरगमने इंडियन आयडॉल 2 आणि सीझन 4 साठी ऑडिशन दिले होते. मात्र अपघातामुळे तिला पुढील फेरीत जाता आलं नाही. नंतर तिने तिचा व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड केला, जो 'चांद छुपा बदल में' च्या निर्माता-दिग्दर्शकाने पाहिला. त्यानंतर तिला शोच्या मुख्य अभिनेत्रीची भूमिका ऑफर करण्यात आली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
TV वर साकारली सीता, सिरीजमध्ये दिले बोल्ड सीन्स; Mirzapur 3 ची सलोनी भाभी नक्की आहे तरी कोण?